Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या…

Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या…

मी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुल वाहिल्याने भविष्यात होणाऱ्या दंगली थांबल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहिल्यानंतर प्रकाश आंबेडकर सत्ताधाऱ्यांच्या रडारवर होते. त्यांच्यावर टीका-टीपण्या केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन भाष्य करीत डिवचलं आहे.

FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्यानंतर राज्यात वादंग पेटलं होतं. अहमदनगरमधील संगमनेरात मोर्चामध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बंद पुकारुन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. अहमदनगरनंतर कोल्हापुरातही औरंगजेबाच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट झळकली होती. त्यावरुनही कोल्हापुरात हिंसाचार घडल्याचं दिसून आलं होतं.

Aani Baani: विनोदाची ‘आणीबाणी’ प्रेक्षकांच्या भेटीला, झळकणार हे कलाकार

या प्रकारानंतर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होत खुलताबादेतल्या औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली होती. त्यानंतर त्यांनी भद्रा मारुतीचेही दर्शन घेतलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली होती. तुमच्याकडून ही अपेक्षा नसल्याचं ते म्हणाले होते.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत थेट भाष्य करीत खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. संभाजी महाराजांच्या हत्येचं कारस्थान हिंदुंनीच रचलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची झोड उठणार असल्याची शक्यता आहे.


संभाजी महाराजांच्या हत्येबाबत आंबेडकर म्हणाले :

छत्रपती शिवरायांनी गणूजी शिर्के यांचे वडिल टिलाजीरावांची जमीन काढून घेतली होती. शिवरायांच्या निधनानंतर गणूजी शिर्के यांनी त्यांची जमीन परत केली नाही म्हणूनच संभाजी महाराज संगमेश्वरला आल्याची माहिती गणूजी शिर्के यांनी औरंगेजबाला दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील सर्व माहिती जेमिनी कडू यांच्या पुस्तकात स्पष्टपणे म्हटल्याचं त्यांनी सांगितलंय.

देशाच्या राष्ट्रपतींना जगन्नाथ मंदिरात प्रवेश नाकारला? द्रौपदी मुर्मूंचा दर्शन घेतानाचा फोटो व्हायरल

गणूजी शिर्केंच्या माहितीनंतर संभाजीराजांनी कैद करण्यात आलं होतं. त्यावेळी औरंगजेबाच्या सल्लागार समीतीमध्ये आबा भटजी यांचा समावेश होता. आबा भटजी यांनी संभाजी महाराजांना कशी शिक्षा द्यावी हे सांगितलं होतं. त्यावेळी मनस्मृतीत सांगितल्याप्रमाणेच संभाजी महाराजांना क्रूरपणे शिक्षा देण्याबाबतचं आबाजी भटजींनी सांगितलं होतं. त्यामुळे संभाजी महाराजांच्या हत्येला हिंदूच जबाबदार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

पवारांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केलं तर गद्दारी कशी काय? फडणवीसांचा राष्ट्रवादीला सवाल

संभाजी राजांप्रमाणे भारतात असलेल्या राज्यकर्त्यांच्या अनेक हत्या औरंगजेबाने केल्या आहेत. औरंगजेबाने स्वत:च्या भावाची, निजामशाही, अदिलाशाहीच्या राज्यकर्त्यांचीही हत्या केली पण फक्त संभाजी राजांचीच हत्याने क्रूरपणे करण्यात आली आहे. संभाजी राजांची हत्या ही सुफी आणि मुस्लिम धर्माशी सहमत नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube