देशाच्या राष्ट्रपतींना जगन्नाथ मंदिरात प्रवेश नाकारला? द्रौपदी मुर्मूंचा दर्शन घेतानाचा फोटो व्हायरल

देशाच्या राष्ट्रपतींना जगन्नाथ मंदिरात प्रवेश नाकारला? द्रौपदी मुर्मूंचा दर्शन घेतानाचा फोटो व्हायरल

President Draupadi Murmu :  देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीच्या जगन्नाथ मंदिरातील हा फोटो आहे. मागील आठवड्यात मुर्मू यांनी या मंदिरात जाऊन पूजा केली होती. मात्र या फोटोवरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

यावेळी मुर्मू यांना मंदिरामध्ये जाऊ दिलं नसल्याचा दावा सोशल मिडीयावर करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्विट केले आहे. आव्हाड यांनी मुर्मूंचा मंदिरात दर्शन घेतानाचा फोटो पोस्ट करत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गाभाऱ्यात प्रवेश नाही ? असे म्हटले आहे. याशिवाय अन्य काही युजर्सनी देखील या आशयाचे ट्विट केले आहे. यावरुन देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान असलेल्या महिला व्यक्तीला देखील फक्त आदिवासी असल्यामुळे मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिला नाही का? असा सवाल विचारला जात आहे.

Ajit Pawar : संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं?

20 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी दिल्लीच्या हौज खास येथील जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथ व त्यांच्या भावा-बहिणीच्या वार्षिक रथयात्रेची पूजा केली. त्यानंतर मुर्मू यांचे मंदिरातील दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच दरम्यान, मुर्मू यांना प्रवेश दिला नसल्याचा आरोप होऊ लागला आहे.

विठूरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांचा मटणावर ताव! धाराशीवमध्ये बीआरएसच्या ताफ्याला ‘बोकड पार्टी’

मुर्मू यांच्या फोटोसोबत आणखी एका फोटोची तुलना करण्यात आला आहे. या फोटोत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव हे दोघे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेताना दिसत आहे. तर त्या फोटोच्या खाली द्रौपदी मुर्मू यांचा फोटो लावण्यात आला असून त्या मंदिराच्या दारात उभ्या राहून दर्शन घेत असल्याचे दिसून येत आहे. यावरुन सोशल मीडियावर त्या आदिवासी असल्याने त्यांना मंदिरात प्रवेश नाकारल्याचे काहींनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube