FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

FIR against Vijay: साऊथचा सुपरस्टार अभिनेता थलापती विजय (Thalapati Vijay) हा फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. त्याने ‘बीस्ट’, ‘मास्टर’सारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आजफ्गाडीला इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन आकारणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये विजयचे नाव अग्रक्रमी आहे. तसेच साऊथ सुपरस्टार थलपथी विजयचे चाहते फक्त दक्षिणेतच नाही तर भारतभर आहेत. त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी विजय चर्चेत असतो. विजयने आपल्या आगामी सिनेमासाठी इतकी रक्कम घेत सर्व रेकॉर्ड्स मोडत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, ‘वारीसू’ नंतर, थलपथी विजय दिग्दर्शक लोकेश कनागराज (Directed by Lokesh Kanagaraj) यांच्या ‘लिओ’ नावाच्या आगामी सिनेमात खूपच व्यस्त असल्याचे दिसत आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार थलपथी विजयला आगामी सिनेमासाठी १५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. परंतु आता हा सिनेमा काही कारणामुळे चर्चेत आला आहे. या सिनेमाची थलपथी विजयवर गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेता थलपथी विजयच्या आगामी ‘लिओ’ सिनेमातील ‘ना रेडी’ हे गाणे तंबाखूच्या सेवनाला प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आला आहे, त्यामुळे तो चांगलाच वादामध्ये सापडला आहे. या गाण्यामध्ये अभिनेता तोंडात सिगारेट घेऊन नाचत असल्याचे दाखवण्यात आला आहे. यामुळे विजयवर अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ‘ना रेडी’ गाण्यात स्मोकिंग दाखवल्यामुळे थलपथी विजय चांगलंच अडचणीत सापडला आहे. गाण्यात दारू आणि तंबाखूच्या सेवनाला प्रोत्साहन दिल्याविषयी अभिनेत्याला मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

Adipurush च नाही तर ‘या’ चित्रपटांनाही संवादांवरुन करावा लागला होता विरोधाचा सामना

तसेच थलपथी विजयच्या ‘ना रेडी’ गाण्यावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे गाणे थलपथी विजयने गायले आहे, तर अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिले आहे. व्हिडिओमध्ये काही BTS क्षण तसेच त्यांच्या नृत्याची झलक दाखवली आहे. त्याच्या वाढदिवसाला पहिल्या पोस्टरबरोबरच हा सॉंग देखील रिलीज करण्यात आला होता. ‘लिओ’च्या फर्स्ट लूक पोस्टरने चाहत्यांच्या अपेक्षा आणखी एका उंचीवर नेल्या आहेत. लोकांनी पोस्टरची तुलना ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’शीही केली. तसेच गौतम वासुदेव मेनन, अर्जुन सर्जा, मिसस्किन, प्रिया आनंद, मन्सूर अली खान, मॅथ्यू थॉमस यांच्यासह दमदार स्टारकास्ट आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube