पवारांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केलं तर गद्दारी कशी काय? फडणवीसांचा राष्ट्रवादीला सवाल
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केली. त्यामुळं ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत जाऊन राज्यात नवं सरकार स्थापन केलं. याला आता एकवर्ष होत आलं तरीही शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोप कमी होत नाहीत. नुकताच विरोधकांनी गद्दार दिवस साजरा केला. दरम्यान, शिंदेंनी बंड केल्यामुळं ठाकरे गट शिंदे गटाला गद्दार आणि बेईमान म्हणून हिनवतोच. मात्र, राष्ट्रवादीही गद्दार अशी टीका करत असते. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीवर (NCP) निशाणा साधला. सभी करे तो रासलीला, मै करू तो कॅरेक्टर ढिला है, अशी राष्ट्रवादीची अवस्था असल्याचं सांगितलं. (Fadnavis’ question to NCP, what is diplomacy if Sharad Pawar does it and treason if Shinde does it?)
केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त चंद्रपुरातील एका सभेला संबोधित करतांना फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, शिदें गटावर ठाकरे गट कायम बेईमानी अशी टीका करत असते. पण मला आश्चर्च वाटलं की, राष्ट्रवादीनेही गद्दारी म्हणून शिंदे गटाला डिवंचलं. सभी करे तो रासलीला, मै करू तो कॅरेक्टर ढिला है, तशी अवस्था आहे. 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. हे सरकार दोन वर्ष चाललं असतं. इंदिराजींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं, तर पाच वर्ष चाललं. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पवारांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केलं तर गद्दारी कशी काय? फडणवीसांचा राष्ट्रवादीला सवाल
आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला शह देण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आलेत. त्यांची संयुक्त बैठक पाटणा येथे झाली. यावरूनही फडणवीसांनी विरोधकांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, या बैठकीत सर्व परिवारवादी पक्ष एकत्रित आले. अन् बैठकीत ठराव काय झाला तर राहुल गांधी यांची दाढी करा आणि त्यांचे लग्न करा… पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले, त्या अमेरिकेतील त्यांचे भव्य स्वागत संपूर्ण जगाने पाहिले आणि दुसरीकडे राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारत कसा वाईट, यावर व्याख्याने देतात. त्यांनी भारतात लोकशाही नाही, असे सांगितले आणि त्यावर अमेरिकेनेच खुलासा करून सांगितले की भारतात लोकशाही आहे आणि ती समृद्ध देखील होते आहे. खरे तर काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही. कारण, आजचाच दिवस आहे, ज्यादिवशी इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली होती, अशी टीका फडणवीसांनी केली.