Satara Police training center : सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिट अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र (Maharashtra Tourism Police Training Centre)उभारण्याचा निर्णय राज्य शासनाकडून(State Govt) घेण्यात आला आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण 38.93 हेक्टर आर जागा सातारा जिल्हा पोलीस (Satara District Police)दलाला उपलब्ध करुन देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे देखील मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून आपल्या जिल्ह्याला एकप्रकारे हे गिफ्टच मानलं जात आहे.
मोठी बातमी : आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण; समीर वानखेडेंसह सर्व आरोपींचे मोबाईल जप्त
शासनातर्फे विविध आपत्तीप्रसंगी बचाव कार्य करण्यासाठी राज्य आपत्ती बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटअंतर्गत आपत्ती परिस्थिती बचाव कार्याचे प्रशिक्षण पोलीस बांधवांना देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाणार आहे.
यासाठी सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयानानगर) येथे कोयना नदीच्या काठावर एकूण 38.93 हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
या प्रशिक्षण केंद्रामुळे राज्याला हक्काचे आपत्ती बचावाचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्र उपलब्ध होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने पुर परिस्थिती हाताळण्याच्या प्रशिक्षण याठिकाणी देणे शक्य होणार आहे. तसेच या केंद्रामुळे पाटण तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
राज्य आपत्ती बचाव दलाकरिता आणि प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी अशी एकूण 264 पदांसाठी 271.41 कोटी रुपयांच्या खर्चास देखील यावेळी मान्यता देण्यात आली आहे.