मोठी बातमी : आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण; समीर वानखेडेंसह सर्व आरोपींचे मोबाईल जप्त

  • Written By: Published:
मोठी बातमी : आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण; समीर वानखेडेंसह सर्व आरोपींचे मोबाईल जप्त

Aryan Khan Case : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूज प्रकरणात चर्चेत आलेल्या समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता वानखेडेंसह NCB च्या इतर आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयच्या FIR मध्ये जेवढे आरोपी आहेत. या सर्व मोबाईलमधील डेटाचं विश्लेषण केले जाणार आहे.

Google सर्च केलं : पत्नी, मुलीची हत्या करत बड्या अधिकाऱ्याची आत्महत्या

SIT च्या अहवालानंतर सीबीआयकडून 29 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर वानखेडेंसह अन्य काही जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज वानखेडेंसह सीबीआयच्या FIR मध्ये जेवढे आरोपी आहेत त्या सर्वांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटाचे विश्लेषण केले जाणार आहे. त्यामुळे आता या डेटातून आणखी कोणती माहिती समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ईश्वर चिठ्ठी राम शिंदेंना पावली ! जामखेडमध्ये भाजपचा सभापती, राष्ट्रवादीचा उपसभापती

सीबीआयच्या FIR मध्ये नेमकं काय? 

सीबीआयने वानखेडेंविरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बनावट असून पैशांसाठी ठरवून करण्यात आल्याचं यामध्ये म्हटलं आहे. तर वानखेडेंनी याच क्रूझ प्रकरणात अभिनेता शाहरूख खानकडे 25 कोटींची लाच मागितली होती. वानखेडेंनी 25 कोटींची मागणी केली पण नंतर 18 कोटींमध्ये ही डील ठरली. त्यातील 50 लाख रूपये वानखेडेंनी आगाऊ घेतल्याचा आरोप यात करण्यात आलाय.

Cannes Film Festival 2023 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; ‘या’ अभिनेत्रीचा रेड कार्पेटवर डेब्यू!

देशभक्त असल्याची शिक्षा दिली जातीये

दरम्यान, सीबीआयच्या कारवाईनंतर रविवारी समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “सीबीआयने माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि 12 तासांहून अधिक काळ झडती घेतली. छाप्यादरम्यान सीबीआयकडून 18,000 रुपये आणि मालमत्तेशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. मी सेवेत येण्यापूर्वी ही मालमत्ता खरेदी केली होती. मी आहे. देशभक्त असल्याची शिक्षा दिली जात आहे.”, असं त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने अंधेरीतील माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला आणि काहीही सापडले नाही. सीबीआयच्या आणखी सात अधिकाऱ्यांच्या पथकाने माझ्या सासरच्या घरी देखील छापेमारी केली.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

नवऱ्यासाठी क्रांती रेडकर मैदानात

दुसरीकडे पतीवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी  प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, आपल्या नवऱ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, हे सर्वांना माहीत आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या कारवाईला पूर्ण सहकार्य करत आहोत. आमचा विश्वास आहे. कायदा आणि सुव्यवस्था आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube