ईश्वर चिठ्ठी राम शिंदेंना पावली ! जामखेडमध्ये भाजपचा सभापती, राष्ट्रवादीचा उपसभापती

  • Written By: Published:
ईश्वर चिठ्ठी राम शिंदेंना पावली ! जामखेडमध्ये भाजपचा सभापती,  राष्ट्रवादीचा उपसभापती

Ram Shinde Vs Rohit Pawar : जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार चुरस होती. दोन्ही गटाचे समसमान नऊ संचालक निवडून आले होते. त्यामुळे सभापती व उसभापती निवडीकडे लक्ष लागले होते. दोन्ही पदासाठी आज मतदान झाले. त्यातही समसमान मते मिळाली. शेवटी दोन्ही पदासाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सभापतीपद आमदार राम शिंदे गटाकडे गेले. तर उपसभापतीपद हे आमदार रोहित पवार यांच्या गटाकडे गेले आहे. भाजपचे शरद कार्ले हे सभापतीपदी, तर राष्ट्रवादीचे कैलास वराट हे उपसभापती विराजमान झाले आहे.

Google सर्च केलं : पत्नी, मुलीची हत्या करत बड्या अधिकाऱ्याची आत्महत्या

नुकतीच कर्जत-जामखेड बाजार समितीची निवडणूक झाली होती. दोन्ही बाजार समितीसाठी आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या गटात जोरदार चुरस होती. त्यात राम शिंदे यांनी दोन्ही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडले होते. शिंदे यांनी निवडणुकीत रोहित पवारांना मोठे धक्के दिले होते. दोन्ही ठिकाणी मतदारांनी दोन्ही गटाला स्पष्ट बहुमत दिले नाही. दोन्ही बाजार समित्यांमध्ये दोन्ही गटाला समसमान नऊ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सभापती व उसभापती निवडीसाठी चुरस निर्माण झाली होती.

संचालक फुटू नये म्हणून दोन्ही गटाकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. दोन्ही गटाने आपले संचालक हे सहलीला पाठविले होते. दोन्ही गटाचे संचालक आज जामखेडमध्ये दाखल झाले. सभापतीपदासाठी शिंदे गटाकडून शरद कार्ले, तर रोहित पवार गटाकडून सुधीर राळेभात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उपसभापतीपदासाठी शिंदे गटाकडून सचिन भुमरे, तर पवार गटाकडून कैलास वराट यांनी उमेदवारी दाखल केली. मतदान झाल्यानंतर सभापती, उपसभापतीपदाचा उमेदवाराला समसमान नऊ मते मिळाली.

महाविकास आघाडीच्या बैठकीत काय खलबतं? नाना पटोलेंनी थेट सांगितलं
त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही पदाधिकारी निवडण्यासाठी ईश्वर चिठ्ठीची मदत घेतली. त्यात सभापतीची ईश्वर चिठ्ठी ही शरद कार्ले यांच्या नावाची निघाली आहे. तर उपसभापतीची चिठ्ठी ही कैलास वराट यांच्या नावाची निघाली आहे.

जामखेड बाजार समितीमध्ये भाजप-राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस होती. ही चुरस सभापती, उपसभापती निवडीमध्ये दिसून आली. भाजपचा सभापती, तर उपसभापती राष्ट्रवादीचा झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube