Radhakrishna Vikhe Patil On Mahavikas aaghadi : राज्यभरात आज 63 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड वर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्याचं स्मरण करत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आज महाराष्ट्र दिन आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे. तो मोठ्या प्रमाणात राज्यभर साजरा केला जातो. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड वर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी सांगितलं की, आज पासून राज्यांमध्ये सहाशे रुपये ब्रास वाळू मिळणार असून याचा शुभारंभ आज अहमदनगर जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी होणार आहे. महसुल विभागाच्या या निर्णयामुळं वाळू माफिया वर यामुळे मोठे बंधन येणार असल्याचं ते म्हणाले.
Anupam Kher: ‘या’ कारणावरून अनुपम खेर यांनी अखेर आमिर खानला सुनावलं, म्हणाले…
यावेळी त्यांनी बाजार समिती निवडणुकांविषयी भाष्य केलं. ते म्हणाले, बाजार समिती निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशामध्ये भाजप समाधानी आहे. सामान्य शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार मिळावा हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नव्हतं ठराविक लोकांच्या ताब्यामध्ये सोसायटी ग्रामपंचायत असल्याने त्यांना मक्तेदारी कायम ठेवायची होती. तरी पण, मुख्यमंत्र्यांनी किमान दहा गुठे जमीन असलेल्या शेतकऱ्यालाही या निवडुकीत उभं राहता येतं, या निर्णयाचं आम्हाला समाधान आहे.
मागील काही दिवसापांसून अजित पवार यांच्याच नावाची राज्याच्या राजकारणात चर्चा आहे. ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चेचं अजित पवारांनी माध्यमांसमोर येत खंडन केलं. मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले, अजित पवार मनापासून कुठे आहेत, हे येणाऱ्या 2-3 दिवसात कळेल असं सांगितले. यावर बोलतांना विखेंनी सांगितलं की, महाविकास आघाडीत अनेक वाद आहेत. मुख्यमंत्रीपदावरून एकमत नाही. विचारांमध्ये एकमत नाही. वज्रमुठ सभा हे घेत आहेत. पण, वज्रमुठ सभा ही सत्ता गेल्याच्या निराशेतून होत असून… वज्रमुठीला तडे गेलेले आहेत.थोड्या दिवसात हे एकमेकां विरुद्ध मुठ उगारतील अशी परिस्थिती पाहायला मिळेल असे वक्तव्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.