राम शिंदेंची जबाबदारी आता राधाकृष्ण विखेंच्या खांद्यावर

आमदार राम शिंदे (Ram Shinde) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप राम शिंदे यांनी थेट राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यावर केला होता. थेट पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार झाली होती. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्टी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले होते. CM […]

Devendra Fadnavis Ram Shinde Radhakrishna Vikhe Patil

Devendra Fadnavis Ram Shinde Radhakrishna Vikhe Patil

आमदार राम शिंदे (Ram Shinde) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप राम शिंदे यांनी थेट राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यावर केला होता. थेट पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार झाली होती. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्टी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले होते.

CM शिंदेंचे प्रफुल्ल पटेलांच्या गडाला हादरे; राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदार पुत्राचा पुढाकार

नगर जिल्ह्याची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगरच्या दौऱ्यावर होते. आमदार राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यातील वाद फडणवीस यांनी मिटविला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत खुर्ची नसलेल्या राम शिंदे यांना खुर्चीची व्यवस्था करून फडणवीस यांनी त्यांना बाजूला बसविले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, म्हणून तर दोघांना सोबत घेऊन बसलो आहे. समन्वय आहे, काही काळजी करू नका. काही वाद नाहीत. वाद असले तरी वादळ नाही, चिंता करु नका. चहाच्या पेल्यातील वादळ आता संपले असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

तिकीटवाटपाच्या चर्चा! भुजबळांनी थेट फॉर्म्युलाच सांगून टाकला

त्यानंतर काहीच वेळात भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात महसूल मंत्री विखे यांनी वाद मिटले असल्याचे आपल्या भाषणातून स्पष्टच केले. रामभाऊ तुमची जबाबदारी आता माझी आहे. आताही आहे आणि पुढे ही आहे, असे विखे यांनी जाहीर करून टाकले आहे. जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप असला पाहिजे. त्यासाठी आतापासून निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे. त्यासाठी मी सर्व काही मदत करणार असल्याचे विखे यांनी जाहीर केले आहे.

विखे यांनी आपल्या भाषणात शिवाजी कर्डिले यांचा उल्लेख केला आहे. शिवाजी कर्डिले हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगली काम सुरू असल्याचे विखे यांनी म्हटले आहे. शिवाजी कर्डिले यांचे राजकीय पुनवर्सन केले असल्याचे विखे यांना आपल्या भाषणातून सांगायचे आहे. तसेच राम शिंदेंची जबाबदारी घेतल्याचे जाहीर करून अंतर्गत वाद मिटल्याचे विखे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले आहे.

Exit mobile version