CM शिंदेंचे प्रफुल्ल पटेलांच्या गडाला हादरे; राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदार पुत्राचा पुढाकार

CM शिंदेंचे प्रफुल्ल पटेलांच्या गडाला हादरे; राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदार पुत्राचा पुढाकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या गोंदियातील गडाला मोठा हादरा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमधील राष्ट्रवादीच्या २ नगराध्यक्ष आणि तब्बल १२ नगरसेवकांनी शिवसेनेते जाहीर प्रवेश केला. याशिवाय शिवसेना (UBT) च्या ४ विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Arjuni Morgaon’s 15 corporators from ncp and Thackeray camp joined Shiv Sena)

विशेष म्हणजे या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चांद्रिकपुरे यांच्या सुपुत्रानेच पुढाकार घेतला होता. अर्जुनी मोरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चांद्रिकपुरे यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ. सुगत मनोहर चांद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवुन आम्ही मतदारसंघातील विकासासाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे डॉ सुगत चंद्रिकापुरे यांनी यावेळी सांगितले.

कोणा कोणाचा झाला प्रवेश?

सडक अर्जुनी नगर पंचायत

१. श्री तेजारमजी मडावी – नगराध्यक्ष
२. सौ. वंदना डोंगरवार – उपाध्यक्ष
३. सौ. कामिनी कोवे – सदस्या
४. सौ. शशिकला टेंभुर्णी – सदस्या
५. श्री. अंकित भेंडारकर – सदस्य
६. श्री. देवचांदाजी तरोणे- सदस्य
७. श्री. महेंद्र वजारी – सदस्य
८. सौ. शाहिस्ता शेख – सभापती
९. सौ. दिक्षा भगत – सदस्या
१०.सौ. सायमा शेख सदस्या
११.श्री. आश्लेष अंबादे सदस्य
१२. श्री. गोपीचंद खेडकर सदस्य

अर्जुनी मोरगाव

१. सौ. मंजुषा बारसागडे – नगराध्यक्ष
२. श्री. सागर आरेकर – सभापती बांधकाम
३.सौ. दिक्षा शहारे – सदस्या

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube