Ambedkar Jayanti : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक उत्कर्षाकरीता पेटविलेल्या क्रांतीच्या मशालीचे एक जनक होते. या महान कर्तृत्ववान देशभक्ताने भारतीय घटनेच्या माध्यमातून देशात समानतेचं व सन्मानाचे कार्य केले आहे. बाबासाहेब कोणत्या एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते तर भारत देशातील सर्व समाजाचे नेतृत्व करणारे महापुरुष होते असे गौरवोद्गार महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
भारतीय संविधानाचे जनक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीच्या निमित्ताने लोणी बुद्रूक व खुर्द येथील अभिवादन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, भारत देशामध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेतला, समाजासाठी व देशासाठी पराकोटीचा संघर्ष केला.
मानव जातीच्या कल्याण व उध्दरासाठी देशाच्या स्वातंत्र्यपुर्व व नंतरच्या काळामध्ये ज्या-ज्या महापुरुषांनी संघर्ष उभा केला त्या महापुरुषांच्या यादीमध्ये भारततत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वरच्या क्रमांकार घेतले जाते. एक गौरवशाली नेतृत्व भारत देशाला लाभलं. घटनेच्या आधारावर आज देश समृध्दीकडे वाटचाल करीत आहे, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या नंतरही घटनेची पुजा केली जात असून घटनेच्या माध्यमातून शोषित आणि वंचितांना नवी उभारी देण्याचे महत्वपूर्ण काम डॉ. बाबासाहेबांच्या माध्यमातून झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांतीचे फक्त भाग नव्हते तर या सामाजिक उत्कर्षाकरीता पेटविलेल्या क्रांतीच्या मशालीचे ते एक जनक होते. या महान कर्तृत्ववान देशभक्ताने भारतीय घटनेचे शिल्पकार होवून देशात समानतेचं व सन्मानाचे कार्य करुन समाजाच नेतृत्व केले. डॉ.आंबेडकर कोणत्या एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते तर भारतातील सर्व समाजाचे नेतृत्व करणारे एक महापुरुष होते असेही ना.विखे पाटील म्हणाले.
Eknath Shinde ; ‘…तर अशा धमक्यांना आमचे आमदार भीक घालत नाहीत’
लोणी खुर्द येथेही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. यापंसंगी कारखान्याचे संचालक संजय आहेर, राहुल घोगरे, मायकल ब्राम्हणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.