Download App

Raju Shetti : राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

  • Written By: Last Updated:

सोलापूर : कांदा (Onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं शेतकरी (Farmer)आर्थिक अडचणीत आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये (Solapur Market Committee) 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही व्यापाऱ्यानं चेक स्वरुपात दिलेत. राजेंद्र तुकाराम चव्हाण (Rajendra Tukaram Chavhan)असं या शेतकऱ्याचं नाव आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टींनी (Raju Shetti) ट्वीट करत संताप व्यक्त केलाय.

ट्वीटमध्ये राजू शेट्टी म्हणाले की, निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रुपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हे आता तुम्हीच सांगा? असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केलाय.

WhatsApp वापरकर्त्यांच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर ! वाचा काय आहे सत्य

शेतमालाच्या दरात घसरण झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्यानं सोलापूर मार्केटला 17 फेब्रुवारीला जवळपास पाचशे किलो कांदा विकला होता.

तेथील मार्केटमधील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्यानं दोन रुपयांचा चेक शेतकऱ्याला दिलाय. मोटारभाडं, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करुन शेतकऱ्याला फक्त दोन रुपये शिल्लक राहिल्याचं दिसून येतंय. सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्यानं दोन रुपयांचा चेक देत एक प्रकारे शेतकऱ्याची थट्टा केल्याचं दिसून येतंय.

Tags

follow us

वेब स्टोरीज