अहमदनगरध्ये माता रमाबाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त येत्या 27 तारखेला रमाई चळवळीचे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील स्वास्तिक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाची माहिती संमेलनाच्या मुख्य निमंत्रक डॉ. रेखा मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Arvind Kejriwal : भाजप आमदार फोडून सत्ता स्थापन करतंय, अरविंद केजरीवालांचा घणाघात
मेश्राम म्हणाल्या, 27 मे रोजी सकाळी 8 वाजता संविधान सन्मान रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते संमेलनस्थळ अशी असणार आहे. सकाळी 9 वाजता संमेलनाध्यक्ष दिशा पिंकी शेख व उद्घाटक प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष ललिता खडसे यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
अहवाल आले, काँग्रेसचे टेन्शन वाढले! दोन नेत्यांतील वाद टाळण्यासाठी उद्या बैठक
तसेच दुपारी १२ वाजता वंचितांची दिशा या विषयावर प्रा. किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद
होणार असून दुसरा परिसंवाद हा तृतीयपंथी आणि सामाजिक मानासिकता, हक्क व अधिकार या विषयावर शमिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
दिल्लीतील आप नेते सत्येंद्र जैन तिहार जेलच्या बाथरूममध्ये पडले, प्रकृती गंभीर
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना रमाई गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता अहमदनगर येथील प्रसिद्ध कवयित्री प्रा. शर्मिला गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. समारोप सत्रामध्ये सायंकाळी 6 वाजता तर रात्री 8 वाजता विद्रोही सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर संमेलनाची सांगता होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.