Arvind Kejriwal Meet’s Sharad Pawar : दिल्लीकरांना वाचवण्यासाठी पवारांचा केजरीवालांचा कानमंत्र…

Arvind Kejriwal Meet’s Sharad Pawar : दिल्लीकरांना वाचवण्यासाठी पवारांचा केजरीवालांचा कानमंत्र…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नूकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत शरद पवारांनी दिल्लीकरांना वाचवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना कानमंत्र दिला आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजप आमदार फोडून सत्ता स्थापन करत असल्याचा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. दरम्यान, केजरीवाल दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला आहे.

अहवाल आले, काँग्रेसचे टेन्शन वाढले! दोन नेत्यांतील वाद टाळण्यासाठी उद्या बैठक

अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत आमचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजप सरकार त्रास देत आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपविरहीत पक्षांची सत्ता आहे, त्या राज्यातील स्थानिक आमदारांना फोडलं जातं, ते नाही झालं तर आमदारांना ईडीसारख्या तपास यंत्रणांची भीती दाखवली जाते, दोन्ही प्लॅन खोटे ठरल्यास केंद्र सरकारकडून अध्यादेश आणून तिथल्या सत्ताधारी सरकार काम करु देत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

भाजपकडून सध्या देशात जे काही सुरु आहे. ते लोकशाही घातक आहे. दिल्लीच्या लोकांवर अन्याय झाला आहे. दिल्लीत 2015 मध्ये आमचं सरकार बनलं तेव्हा एका सूचनेनूसार दिल्ली सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार काढून घेतले. त्यानंतर आम्ही तब्बल आठ वर्ष संघर्ष केला.

Horoscope 25 May 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे!

अखेर सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आम्हाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आठ दिवसांतच केंद्राने अधिसूचना जारी करुन अधिकार पुन्हा परत घेतले आहेत. त्यामुळेच आम्ही केंद्र सरकारविरोधात देशातल्या सर्वच विरोध पक्षांकडे समर्थन मागत असल्याचं केजरीवालांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकार हे बिल लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करणार आहे. मात्र, राज्यसभेत कोणत्याही एका पक्षाचं बहुमत नाही. त्यामुळे भाजपविरहीत पक्षांनी एकत्र येऊन या बिलाला मंजूर करु नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे. तसेच हे बिल आम्ही मंजूर होऊ देणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं असल्याचं केजरीवालांनी स्पष्ट केलं आहे.

Pakistan : कमांडर हाऊसवरील हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अटक; खदिजा शाह आहे तरी कोण?

दरम्यान, ही लढाई कोणत्याही पक्षाविरोधात नाही. ही दिल्लीची लढाई नाही. ही देशभक्तीची लढाई आहे. ज्यांना देशाविषयी प्रेम आहे त्यांनी आम्हांला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही अरविंद केजरीवालांनी केलं आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube