Pakistan : कमांडर हाऊसवरील हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अटक; खदिजा शाह आहे तरी कोण?

Pakistan : कमांडर हाऊसवरील हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अटक; खदिजा शाह आहे तरी कोण?

Pakistan : पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan)यांना पाकिस्तानमध्ये अटक केल्यानंतर देशभरात हिंसाचार उसळल्याचं दिसून आलं. यादरम्यान लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊसला (Lahore Corps Commander House)लक्ष्य करण्यात आले. या हिंसाचारानंतर पाकिस्तानमध्ये अटकेच्या घटना घडत आहेत. दरम्यान, लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊसवरील हल्ल्यातील मुख्य संशयित खादिजा शाह (Khadija Shah)हिला लाहोरमध्ये अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.

Pune : देशातील शेवटच्या टाडा खटल्याचा निकाल जाहीर; भाई ठाकूर यांच्यासह तिघे निर्दोष

खदिजा शाह यांनी अधिकार्‍यांसमोर शरणागती पत्करली नव्हती, यापूर्वी ती त्यांच्यासमोर स्वत:ला हजर करेल असा दावा केला होता. तिच्या पतीसह इतर कुटुंबियांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना या महिन्यात 9 मे रोजी अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये हिंसक निदर्शने झाली होती. त्यांच्या पक्षाचे नेते आणि समर्थकांनी जिना हाऊसमध्ये घुसून ते पेटवून दिले आणि अनेक लष्करी आस्थापनांवरही हल्ला केला होता.

पाकिस्तानमधील पंजाबचे हंगामी मुख्यमंत्री मोहसिन नक्वी यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की, लष्कराच्या स्थापनेवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या महिलांना कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल. आत्मसमर्पणाच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये, खदिजा शाहच्या कुटुंबाला विविध त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं सांगताना ऐकू येत आहे, असे एक्सप्रेस ट्रिब्यूनने ही बातमी दिली आहे.

खदिजाने पीटीआयची समर्थक असल्याचं कबूल केले आहे. लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊसच्या बाहेर झालेल्या निषेधाचा ती भाग होती परंतु लोकांना हिंसाचार करण्यास प्रवृत्त करण्यासह कोणत्याही चुकीच्या कृत्याबद्दल तिने नकार दिला आहे.

खदिजाने रविवारी एक ऑडिओ क्लीप जारी केली होती,त्यात ती पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असून त्यात आपली चूक मान्य केली आहे. खदिजाने हेही कबूल केलं की रागाच्या भरात लष्करी नेतृत्वाविरुद्ध अयोग्य ट्विट केले होते,मात्र ते आता हटवले आहेत. ती म्हणाली, मी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे. गेले पाच दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याचं त्यात खदिजाने म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube