Download App

Ramdas Kadam : माझ्या विरोधात उद्धव ठाकरेंनी कारस्थान रचलं

  • Written By: Last Updated:

अहमदनगर: शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावर सडकून टीका केलीय. ते परिवारासोबत शिर्डीला साई दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करीत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) देखील आव्हान दिलंय.

उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या पक्षातील लोकांना संपविण्याचं काम केलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं त्यांना उद्धव ठाकरेंनी संपवले आहे. त्यांना आपला मुलगा आदित्य ठाकरेंना देखील संपवयाचं आहे, अशी घाणाघाती टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केली आहे.

दिवस बदलत असतात म्हणूनच मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावं लागलं. माझ्या मुलाला जो त्रास दिला तो मरेपर्यंत मी कदापि विसरणार नाही. जो मला त्रास दिला आहे तो मरेपर्यंत मी कदापि विसरणार नाही. हेच माझं म्हणणं आहे की होय दिवस बदलत असतात आणि ते तुम्ही आता भोगताय, अनुभवताय, अशी टीका कदम यांनी केली.

एकनाथ शिंदे समर्थक रामदास कदम यांनी शिर्डीला साईबाबांच्या दरबारी साकडं घातलय.धनुष्यबाण आणि शिवसेना ही शिंदे गटालाच मिळणार असा विश्वास कदम यांनी व्यक्त केलाय.

मुलगा योगश कदम आणि मला राजकारणातून संपवण्याच पाप उध्दव ठाकरे आणि अनिल परब यांनी केलं मात्र त्यांना यश आल नाही. शिवसेना फोडण्यासाठी अनिल परब आणि उध्दव ठाकरे हेच जबाबदार आहेत.

असे किती ही संजय कदम आणि उद्धव ठाकरे आले तरी दापोली मतदार संघातून योगेश कदमला पराभूत करु शकणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात आले खरं तर यांची नोंद गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणे अपेक्षित आहे, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

Tags

follow us