Download App

नगरकरांना दिलासा! करवाढीचा बोजा टळला

अहमदनगर : महापालिका निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प लवकरच तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थायी समिती समोर घरगुती पाणीपट्टी, रस्ते खोदणे, शहरातील विविध खासगी दुकाने व कार्यालयांचा करवाढीचा प्रस्ताव होता.

मात्र, आज झालेल्या सभेत हा प्रस्ताव कोणताही निर्णय न घेता महासभेकडे वर्ग करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील पाणीपट्टी दुप्पट करावी, अशी मागणी प्रशासनाकडून होत आहे.

Keshav Upadhye : ‘ताई कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले’? : उपाध्येंचा सुळेंवर निशाणा

वाढती महागाई लक्षात घेता विविध विभागांतील उत्पन्न वाढीसाठी कर व शुक्ल वाढीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर मांडण्यात आला होता.

‘बदला घेण्याचा कट आखण्यासाठी…; रोहित पवारांची राज्य सरकारवर जोरदार टीका

या करवाढीला सावेडीतील नगरसेविका रुपाली वारे यांच्यासह सदस्यांनी विरोध दर्शविला. वाढता विरोध पाहून सभापती कुमार वाकळे यांनी हे प्रस्ताव कोणताही निर्णय न देता महासभेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे तुर्तास तरी नगरकरांच्यावरील करवाढीचा बोजा टळला आहे.

Tags

follow us