Keshav Upadhye : ‘ताई कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले’? : उपाध्येंचा सुळेंवर निशाणा

Keshav Upadhye :  ‘ताई कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले’? : उपाध्येंचा सुळेंवर निशाणा

महाराष्ट्र भाजपचे ( BJP )  मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ( Keshav Upadhye ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर ( Supriya Sule )  ट्विट करत निशाणा साधला आहे. ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले?, असा प्रश्न विचारत त्यांनी सुळेंसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. याआधी सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला होता. त्याला केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले आहे.

ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत?, असे म्हणत केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही उद्योग राज्याच्या बाहेर गेला नाही. त्याउलट महाविकास आघाडी सरकार असतानाच अनेक उद्योग अनेक राज्याच्या बाहेर गेले आहेत. महाराष्ट्र आपल्याकडून थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना, असा प्रश्न विचारत त्यांनी सुळेंना टोला लगावला आहे.

दरम्यान याआधी सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला होता. भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय?, असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय, अशी टीक सुळे यांनी ट्विटद्वारे केली होती.

याआधी  भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भीमाशंकर ज्योतीर्लिंग हे आसाममध्ये असल्याचे पोस्टर शेअर केले होते. आसाम सरकारने अधिकृतपणे भीमाशंकर ज्योतीर्लिंग हे आसाममध्ये असल्याचे म्हटले आहे. यावरुन महाराष्ट्रात वाद सुरु झाला आहे. भाजपवर महाविकास आघाडीकडून टीका करण्यात येते आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube