‘बदला घेण्याचा कट आखण्यासाठी…; रोहित पवारांची राज्य सरकारवर जोरदार टीका

‘बदला घेण्याचा कट आखण्यासाठी…; रोहित पवारांची राज्य सरकारवर जोरदार टीका

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग पुण्यात आहे, अशी देशभरातील कोटय़वधी शिवशक्तांची वर्षानुवर्षांची श्रद्धा आहे. पण भीमाशंकराचे सहावे ज्योतिर्लिग पुण्यात नाही तर आसाममध्ये आहे असा अजब दावा आसाम सरकारने मुंबईतल्या वृत्तपत्रातील जाहिरातीद्धारे केला आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) देखील जोरदार टीका केलीय.

भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग (Bhimashankar jyotirlinga) सहावं नसून ते आसाममध्ये असल्याचा अजब दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलाय.. त्यामुळं राज्यात बदला घेण्याचा कट आखण्यासाठी गुवाहाटीला जाऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांचा (Assam Chief Minister) पाहुणचार घेणारे या दाव्याचा कसा ‘बदला’ घेतात, याची महाराष्ट्र वाट पाहतोय…अशी टीका रोहित पवार यांनी यावेळी केली.

गुजरातमधील भाजपप्रणीत सरकारने महाराष्ट्रामधील सर्व उद्योग पळवत आहेत. आता आसाममधील भाजपप्रणीत सरकार महाराष्ट्रातील देव देखील पळवण्याच्या तयारीत असल्याची भावना राज्यामधील जनतेमध्ये निर्माण होत आहे. या प्रकरणावर काँग्रेसने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदुत्ववादी सरकार म्हणवून घेणाऱया शिंदे आणि भाजपने यावर भूमिका जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

यासंदर्भात काल ट्विट करताना काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी भाजपला आणि शिंदे गटाला चांगलेच धारेवर धरले आहे. सचिन सावंत म्हणाले की, केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपच्या आसाम सरकारचा दावा आहे की, भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यावर शिंदे-फडणवीस सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करून आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे. भाजपने केवळ महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्याच नव्हे, तर तमाम हिंदूंच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube