Download App

माहिती अधिकार कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे निधन

अहमदनगर : अहमदनगर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे आज निधन झाले. ते 50 वर्षांचे होते.

सातारा गोळीबाराचा विषय थेट विधानसभेत, पवार म्हणतात…

विठ्ठल बुलबुले जिज्ञासा अकादमीचे संचालक व ‘यशदा’चे माहिती अधिकार विषयक मानद व्याख्याते होते. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

BJP Pune : जगदीश मुळीक खासदारकी लढवणार की आमदारकी?

बुलबुले डाव्या विचारसणीचे होते. बुलबुले डाव्या चळवळीत कायमच अग्रेसर राहिले आहेत. त्यांना डाव्या चळवळीतील अग्रग्यणी म्हणून ओळखले जात होते.

त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बुलबुले यांच्या जाण्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

Maharashtra Politics : ‘रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला ‘जोकर’; भास्कर जाधवांची जहरी टीका

बुलबुले यांच्यावर पुरोगामी विचारांचा अधिक पगडा होता. महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे बीज त्यांनी स्वत:मध्ये पेरलं होते.

Tags

follow us