BJP Pune : जगदीश मुळीक खासदारकी लढवणार की आमदारकी?

BJP Pune : जगदीश मुळीक खासदारकी लढवणार की आमदारकी?

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या पुणे शहराध्यक्ष बदलण्याचा चर्चा सुरू आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे ते लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. परंतु, येणाऱ्या काही दिवसांत पुणे शहर भाजपमध्ये निश्चितपणे बदल होण्याचे संकेत प्रदेश भाजपने दिले आहेत. त्यामुळे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आता खासदारकीची तयारी करणार की आमदारकी लढवणार याविषयी प्रश्न विचारला असता जगदीश मुळीक म्हणतात पक्ष जो आदेश देईल तो मानून मी निवडणुकीची तयारी करणार आहे.

जगदीश मुळीक म्हणतात की, कुठलीही इलेक्शन असेल तर त्याच्यामध्ये जय-पराजय हा असतोच. आपल्या सगळ्यांना माहिती की १९८४ साली भाजपचे दोन खासदार होते आणि त्या दोन खासदारांची पार्टी आज तीनशे तीन वर पोहोचली आहे. पराभव-विजय हे आम्हाला नवीन नाही. कसब्यात पराभव झाला. आम्ही मान्य केला आहे. जनतेने दिलेला कौल कुठल्याही पक्षाला व्यक्तीला मान्य करावाच लागतो. परंतु, आम्ही आता निश्चय केलाय दीड वर्षानंतर कसबा भाजप पुन्हा जिंकणार आहे.

Jayant Patil : देवस्थानच्या जमिनी लाटल्या जातात… सरकार बघ्याच्या भूमिकेत!

काँग्रेस, महाविकास आघाडीला आता पराभवाची सवय लागली आहे. या पराभवाच्या सवयीमध्ये एखादा जर त्यांचा विजय झाला तर त्या विजयचा एवढा भांडवल केलं जातं आहे की जणू काही सगळं जग जिंकले आहे. ज्या वेळेला कसब्याचा निकाल लागला त्याच वेळेला चिंचवडचा देखील निकाल लागला. त्याच वेळेला देशातल्या तीन राज्यांचा निकाल लागला. तिथे काँग्रेसचा सुफडा साफ झाला. पण त्याच्याकडे त्यांनी कधी लक्ष दिल नाही. एवढ भांडवल करण्याचा प्रयत्न केला की एक निवडणूक जिंकली की पुढच्या सगळ्या निवडणुका मग लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायतीचे असतील प्रत्येक निवडणुकीचे समीकरणे वेगळे असतात. स्थानिक, राज्याच्या, देशाच्या असतील त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम पुढे होणार नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये पाच वर्ष भाजपची सत्ता होती. त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले आहे. पुण्याची मेट्रो भाजपने पूर्ण केली. अनेक ठिकाणी रस्ते बांधले, गार्डन बांधले, हॉस्पिटल बांधण्याचा प्रयत्न करतोय. अनेक चांगले काम भाजपच्या सत्ता काळात झाले आहेत. कोविडमध्ये काम करणार मदत करणारी पार्टी फक्त भारतीय जनता पार्टी होती. त्यामुळे मला विश्वास आहे की जेव्हा महापालिकेची निवडणूक होईल. त्यावेळेला भाजपच सत्तेवर येईल आणि शंभर पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा दावा जगदीश मुळीक यांनी यावेळी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube