सीईओंकडून पहिल्याच दिवशी साई संस्थानच्या कारभाराची ‘चिरफाड’, दलालांनी दिली ‘ऑफर’

Shirdi: साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पी. सीवा शंकर यांची नियुक्ती झाली आहे. या पदाचा कारभार हाती घेण्यासाठी आलेल्या पी. सीवा शंकर आपल्या कामाचा झलक दाखवत साई संस्थांच्या कारभाराची पहिल्याच दिवशी चिरफाड केली आहे. साई भक्तांची दलालांकडून होत असलेली लूट, भक्तांना सोयीसुविधा मिळत नसल्याचे साई संस्थानच्या सीईओंच्या पाहणीत निदर्शनात आले आहे. RR vs […]

Shivshankar Shirdi

Shivshankar Shirdi

Shirdi: साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पी. सीवा शंकर यांची नियुक्ती झाली आहे. या पदाचा कारभार हाती घेण्यासाठी आलेल्या पी. सीवा शंकर आपल्या कामाचा झलक दाखवत साई संस्थांच्या कारभाराची पहिल्याच दिवशी चिरफाड केली आहे. साई भक्तांची दलालांकडून होत असलेली लूट, भक्तांना सोयीसुविधा मिळत नसल्याचे साई संस्थानच्या सीईओंच्या पाहणीत निदर्शनात आले आहे.

RR vs GT : गुजरातच्या फिरकीपुढे राजस्थान डाव केवळ 118 धावांत आटोपला

साईबाबा संस्थानच्या ट्रस्टला सहा महिन्यानंतर आयएएस अधिकारी हे सीईओ म्हणून लाभले आहे. पी. सीवा शंकर हे शिर्डी येथे बदलून आले आहे. अधिकारी पदभार स्वीकारण्यासाठी येतात म्हणून त्याची तयारी केली जाते. परंतु पी. सीवा शंकर हे पदभार स्वीकारण्यासाठी शिर्डीत आले. त्यांनी संस्थानचे अधिकारी यांना याचा कल्पनाही दिली नाही. सीवा शंकर हे शिर्डीत नवीन आलेले असल्याने त्यांना कोणीही ओळखत नव्हते. गुरुवारी सीवा शंकर हे शिर्डीत आले. ते थेट दर्शन रांगेत घुसले. त्या ठिकाणी खेळती हवा नसल्याने लहान मुलांची साईदर्शन बारीत होणारी घुसमट, भाविकांवर खेकसणारे संस्थांनचे कर्मचारी, झटपट दर्शनाची ऑफर देणारे मध्यस्थ आणि दलाल याचा अनुभव थेट सीईओ यांनाच आला.

पवारांचा राजीनामा मागे, लगेच अजितदादा लागले कामाला

त्यानंतर काही वेळाने ते साई संस्थानच्या कार्यालयात गेले होते. सीईओचा पदभार असलेले उपजिल्हाधिकारी राहुल जाधव हेही उपस्थित नव्हते. ते आजारी होते. काही वेळाने ते कार्यालयात आले. त्यांच्याकडून सी. सीवा शंकर यांनी पदभार स्वीकारला. सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उपस्थितांसमोर आलेला अनुभव सांगितला आहे. सगळ्या परिस्थितीत बदल करणार आणि भाविकांचा सुलभ साई दर्शन घडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

Exit mobile version