RR vs GT : गुजरातच्या फिरकीपुढे राजस्थान डाव केवळ 118 धावांत आटोपला
RR vs GT : आयपीएल 2023 च्या 48 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. राजस्थान रॉयल्सने 9 पैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने देखील 9 सामने खेळले असून सहा जिंकले आहेत आणि सध्या ते अव्वल स्थानावर आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरातला विजयासाठी 119 धावांचे लक्ष्य दिले आहे.
राजस्थान रॉयल्सचा डाव:
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली आणि दुसऱ्याच षटकात जोस बटलरची विकेट गमावली, त्याला मोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या चेंडूवर झेलबाद केले. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांच्यात 36 धावांची भागीदारी झाली. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी या सामन्यात अवघ्या 14 धावा करून मोहित शर्माच्या थ्रोवर धावबाद झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर राजस्थानचा कर्णधार सॅमसन, आर.के. अश्विन आणि रियान पराग यांच्या विकेट्स अंतराने गमावल्या. जोशुआ लिटलने सॅमसनला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद केले. त्याचवेळी राशिद खानने अश्विन आणि परागची विकेट घेतली.
संजू सॅमसनने 20 चेंडूत 30 धावांची खेळी खेळली, ज्यात तीन चौकार आणि 1 षटकार चा समावेश आहे. पाच गडी बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो केवळ 12 धावा करून नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. युवा फलंदाज ध्रुव जुरेलही 9 धावा करून नूर अहमदच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर रशीद खानने एलबीडब्ल्यू आऊट झालेल्या शिमरॉन हेटमायरच्या (7) रूपाने राजस्थानला आठवा धक्का दिला. जो एलबीडब्ल्यू आऊट झाला. राजस्थानचा संघ 100 धावाही करू शकणार नाही असे वाटत होते, मात्र ट्रेंट बोल्टने 15 धावांची उपयुक्त खेळी करत संघाची लाज वाचवली. गुजरातकडून राशिद खानने तीन तर नूर अहमदने दोन खेळाडूंना बाद केले.