wrestlers Protest : दिल्ली पोलिसांच्या धक्काबुक्कीनंतर कुस्तीपटू आक्रमक, सरकारला पदकं माघारी देण्याची धमकी
wrestlers threaten to return medals awards : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाच्या (sexual abuse) आरोपावरून दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील कुस्तीपटूं मागील गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं आणि त्यांची चौकशी व्हावी, ही आंदोलकांची मागणी आहे. दरम्यान, त्या आंदोलनाच्या ठिकाणी काल रात्री आंदोलक कुस्तीपटू (Protest wrestler) आणि पोलिस एकमेकांमध्ये भिडल्याने मोठा राडा झाला.
बुधवारी रात्री उशिरा जंतरमंतरवर आंदोलक कुस्तीपटूंसोबत दिल्ली पोलिसांची झटापट झाली. कुस्तीपटूंना निषेधाच्या ठिकाणी अतिरिक्त गाद्या आणि लाकडी बाक आणायचे होते. कारण संध्याकाळी राष्ट्रीय राजधानीत झालेल्या पावसामुळे त्यांचे जुने गाद्या ओले आणि ओले झाले होते. पण दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना निषेधाच्या ठिकाणी गाद्या आणि बेंच घेऊन जाण्याची परवानगी दिली नाही. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पोलिसाने कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि संगीता फोगट यांच्याशी गैरवर्तन केले. त्याने महिला कुस्तीपटूंनाही शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा…
यावर कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अश्रुंचा बांध फुटला तिने यावेळी परखड शब्दांत केंद्र सरकारला सवाल केला विनेश म्हणाली होती की, ‘आम्ही देशीसाठी पदकं जिंकली तेव्हा आम्हाला वाटंल नव्हतं की, आम्हाला हा दिवस पाहावा लागेल. त्यामुळे मी म्हणते की कोणत्याही खेळाडुंनी देशासाठी पदकं जिंकू नये.’ तसेच हा दिवस पाहण्यासाठीच आम्ही पदकं मिळवली का? असं तिने केंद्र सरकारला खडसावून विचारले होत.
त्यानंतर आता या कुस्तीपटुंनी सरकारला आपले जिंकलेली पदकं आणि पुरस्कार परत करण्याची धमकी सरकारला दिली आहे. हे पदक आणि परत करून एक सामान्य जीवन जगू इच्छीत आहोत. ऑलंपिकमध्ये कांस्य पदक विजेता बजरंग पुनिया याने असं स्पष्ट शब्दांत सरकारला सांगितलं आहे. दरम्यान या उपोषण करणाऱ्या कुस्तीपटुंमध्ये विनेश, साक्षी आणि बजरंग तिघेही देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार खेल रत्न विजेते आहेत. तर साक्षी (2017) आणि बजरंग (2019) ला देशातील चौथा सर्वोच्च नागरिक सम्मान पद्मश्रीने देखील सम्मानित करण्यात आलं आहे.