कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी ईडीने (ED) हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) समन्स बजावले होते. त्याविरोधात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने कोणताच दिलासा दिलेला नाही. उलट त्यांना कोर्टाने दणका दिला आहे. तुम्ही काही केले नाही म्हणता तर मागच्या दाराने का पळून गेलात, असा सवाल भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (SamarjitSingh Ghatge) यांनी केला आहे.
ते पुढं म्हणाले की, मुश्रीफांना कोर्टाच्या निर्णयावर विश्वास नाही. जेव्हा ईडीचा छापा पडला तेव्हा मुश्रीफ 52 तास फरार होते, अशी टीका केली आहे. ईडीच्या समन्सला स्टे करण्यासाठी ते कोर्टात गेले आहेत. ते त्यांच्या मर्जीने ईडी कार्यालयात गेलेले नाहीत. हायकोर्टाच्या निर्देशानुसारचं ते ईडी कार्यलयात गेले. आम्हाला अटक करायची नव्हती असा खुलासा ईडीने कोर्टात दिला. ईडी दारात आली त्यावेळी महिलांना पुढे करुन पुरूष मागच्या दाराने पुळून गेले, अशी टीका समरजितसिंह घाटगे यांनी केली हसन मुश्रीफ यांच्यावर केली आहे.
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
40 कोटी रुपये मुश्रीफांनी कोठे गायब केले हे समजू नये यासाठी त्यांचे चार्टर्ड अकाउंट महेश गुरव हे देखील गायब होतात. याचा अर्थ काय? हसन मुश्रीफ आरोपी नसून गुन्हेगार आहेत का? नियम तोडून त्यांनी कर्जपुरवठा केलाय, असा हल्लाबोल समरजितसिंह घाटगेंनी यांनी मुश्रीफांवर केला आहे.