शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
नागपूर : शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणातला खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते वरून सरदेसाई यांनी केला आहे. शीतल म्हात्रे यांचं व्हायरल व्हिडिओ प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी पाच जणांना अटकही करण्यात आली असून राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
Asim Sarode म्हणातात… अपात्र आमदारांचा मुद्दा पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची चिन्हे..!
त्यानंतर आता ठाकरे गटाचे सरदेसाईंनी गंभीर आरोप केला आहे. सरदेसाई म्हणाले, जर शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे, तो समोर आला पाहिजे, माझी जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे याने तो संपूर्ण व्हिडिओ त्याच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केले असल्याचंही ते म्हणाले आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांचे वाढले बळ; आंदोलनादरम्यान वंचितने केली मोठी घोषणा..
या प्रकरणी कोणाला अटक व्हायची असेल तर ती राज सुर्वे यांना व्हायला पाहिजे, मुंबई पोलीस सक्षम आहेत. ते खऱ्या आरोपीला अटक करतील. कारण हा व्हिडिओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच बनवल्याचा दावा ही सरदेसाई यांनी केला आहे.
जे नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम आहे.त्यांच्यावर रोज आरोप होत आहे, कारवाया केल्या जात आहे. सध्या केंद्र तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहे, मात्र, ते नेते भाजपमध्ये गेले, त्यांच्यावरील कारवाया थांबतात. जनता हे सगळं पाहत असल्याचंही सरदेसाई म्हणाले आहेत.