सरकारी कर्मचाऱ्यांचे वाढले बळ; आंदोलनादरम्यान वंचितने केली मोठी घोषणा..
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केली आहे. या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. तसेच विरोधी पक्षांनीही आज अधिवेशनात जुन्या पेन्शन योजनेबाबत आवाज उठवला. सरकारने या आंदोलनावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit Bahujan Aghadi) या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सरकारमध्ये पेन्शन स्कीम बंद करण्यात आली. बंद करते वेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं, की वीस वर्षानंतर याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होतील. आज ते परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरू करावी म्हणून आंदोलनाला सुरुवात केली आहे. कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे.
Old Pension Scheme : चर्चा फिस्कटली… पुन्हा नवी समिती स्थापन करणार!
पेन्शन चालू झाली पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे. काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला यामुळे काँग्रेस पक्षाचेही आम्ही अभिनंदन करतो. पेन्शन स्कीम लागू झाली पाहिजे यासाठी आपण लढताय त्याबद्दल पक्षाच्या वतीने शुभेच्छा, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारबरोबर कर्मचारी संघटनांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चर्चा फिस्कटली आहे. मात्र, राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती आहे. याबाबत एक समिती स्थापन करावी अशी सरकारने भूमिका घेतली आहे.
satyajeet tambe ; जुनी पेन्शन लागू करणं शक्य, अधिकाऱ्यांकडून सरकारची दिशाभूल
राज्यभरातील कर्मचारी संघटना आणि विरोधक यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकारबरोबर या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.