Download App

सांगलीमध्ये भीषण अपघात; एकाच घरातील चौघांचा जागीच मृत्यू

Sangli Accident : सांगली (Sangli)जिल्ह्यात आज (दि.4) कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (Big Accident)झाला आहे. हा अपघात विटा सातारा रोडवर (Satara Road) नेवरी गावाजवळ झाला आहे. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

व्याायाम योगा करा, वाढलेल्या ढेऱ्या कमी करा, नाहीतर..; ओमराजेंनी भर बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावलं

कारमधील सर्वजण तासगाव तालुक्यातील गव्हण गावचे आहेत. चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती ही अपघातानंतर गाडीतील एअरबॅग उघडल्याने बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपघातामध्ये सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादोबा काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंसी आणि मालाड (मुंबई) येथील कारचालक योगेश कदम हे जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

हा अपघात सकाळी सातच्या दरम्यान शिवाजीनगरच्या पुढे विटा हद्दीत झाला. विटा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आज सकाळी विट्यावरुन ट्रॅव्हल्स बस विटा महाबळेश्वर राज्य मार्गावरुन सातारच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी साताऱ्याकडून येणारी कार विटाच्या दिशेने वेगात निघाली होती. विटा हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे राज्यमार्गावर असलेल्या उताराच्या ठिकाणी हा अपघात झाला. कारमधून एकूण पाचजण प्रवास करीत होते.

विटा हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे राज्यमार्गावर असलेल्या उताराच्या ठिकाणी हा अपघात झाला. कार गाडीमध्ये एकूण पाच जण प्रवास करीत होते. चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती ही अपघातानंतर गाडीतील एअरबॅग उघडल्याने बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags

follow us