सांगली : पहिली महिला महाराष्ट्र केसरी (Women Maharashtra Kesari) स्पर्धा सांगलीच्या (sangli) प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) हिने जिंकली आहे. तिने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला काही मिनिटांमध्येच चितपट करत पहिली महाराष्ट्र केसरी ठरली आहे. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार सांगलीत रंगला.
हिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 23 आणि 24 मार्च दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची वैष्णवी पाटील यांच्यात पार पडली.
राहुल गांधींना झालेली शिक्षा चुकीची, वकील सरोदेंनी सांगितली घटनेतील तरतुद
कधीकाळी दोघी एकाच रुममध्ये राहत होत्या. तेव्हा मैत्रिणींमधील या लढतीची उत्सुकता सर्वांमध्ये होती अखेर प्रतीक्षा बागडीने ही स्पर्धा जिंकली आहे. सांगलीच्या तुंग गावची असलेली प्रतिक्षा बागडी ही 21 वर्षांची असून ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इंथ सराव करते. राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने पदके पटकावली आहेत.