Download App

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचे शब्द गणपतरावांच्याच ठायी, फडणवीसांंकडून आठवणींना उजाळा

कष्टकरी, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचे शब्द गणपतरावांच्याच ठायी होत्या, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. दरम्यान, सांगोल्यात आज गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार-अजितदादांच्या भेटीवर फडणवीसांचे कानावर हात; म्हणाले, मला जर..

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमदार असताना गणपतराव मंत्रिपदाच्या मोहात कधीच अडकले नाहीत. आम्हाला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. ते भाषणाला उठायचे त्यावेळी आम्हाला सांगायचे की, तुम्ही फक्त विदर्भाच्या सिंचनाचं बोलतायं पण महाराष्ट्रातील सर्वदूर इतर भागांतील पाणी प्रश्नाबाबत समजून घ्या, आज गणपतराव देशमुख यांच्यामुळेच आम्हाला महाराष्ट्रातील पाणी समस्या समजल्या असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

तसेच गणपतरावांच्या भाषणातून आम्हाला नेहमीच दिशा मिळत होती. राज्यातल्या कष्टकरी, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचे शब्द गणपतरावांच्या ठायी होते, ते 11 वेळा निवडून आले देशात एक रेकॉर्ड केला. आमदार असताना विधानसभेत एकही दिवस सुट्टी न घेणारा आमदार आणि विधानसभेत ते सर्वांच्या शेवटी जात असल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे.

विशेष म्हणजे या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आज दुसऱ्यांदा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर पाहायला मिळाले आहेत. याआधी पुण्यातील टिळक पुरस्कार सोहळ्यात दोन्ही एका मंचावर आले होते. या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने, आमदार शहाजीबापू पाटील, जयंत पाटील आदी उपस्थित होते.

Tags

follow us