राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक
Rajput Karni Sena : राजस्थानमधील उदयपूरमध्ये राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष भंवर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या भंवर सिंग यांना गोळी उदयपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उदयपूरमधील या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.
जुन्या वैमनस्यातून घटना घडल्याची माहिती
राजपूत करणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षावर भरदिवसा गोळ्या झाडल्यानंतर या प्रकरणाचा करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. दिग्विजय नावाच्या व्यक्तीने भंवर सिंह यांच्यावर गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आली आहे. प्राथमिक तपासात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. भंवर सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
’50 टक्के कमिशनचं सरकार’वरुन वादंग! प्रियंका गांधींसह कमलनाथ यांच्यावर गुन्हा…
आरोपीला मारहाण केली
उदयपूरमध्ये राजपूत करणी सेनेची बैठक सुरू असताना भंवर सिंह यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. अचानक गोळीबार झाला. मात्र, गोळीबार करणाऱ्या आरोपीला स्थानिक लोकांनी लगेचच पकडले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.