’50 टक्के कमिशनचं सरकार’वरुन वादंग! प्रियंका गांधींसह कमलनाथ यांच्यावर गुन्हा…

’50 टक्के कमिशनचं सरकार’वरुन वादंग! प्रियंका गांधींसह कमलनाथ यांच्यावर गुन्हा…

मध्य प्रदेशातील कथित ’50 टक्के कमिशनचं सरकार’ ट्विटवरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा पाय खोलात जाणार असल्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांचं कथिक 50 टक्के कमिशनचं सरकार ही टीका चांगलीच झोंबली आहे. या टीकेविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून ट्विटप्रकरणी प्रियंका गांधी यांच्यावर मध्य प्रदेशात 41 पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रियंका गांधींना टीका करणं चांगलचं भोवणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रियंका गांधींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्य प्रदेशात भाजपविरुद्ध काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल म्हणाले, भाजप प्रियंका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्वच नेत्यांवर शेकडो गुन्हे दाखल करु शकत, असल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच खासदार अरुण यादव म्हणाले, राज्यात 50 टक्के आयुक्तांचे सरकार कार्यरत असून त्याविरोधात आम्ही आवाज उठवल्याने भाजपकडून माझ्यासह, प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आधी आम्ही गोऱ्यांशी लढलो आता त्यांच्याशी लढणार असल्याचं यादव म्हणाले आहेत.

CM शिंदेंच्या ठाण्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; महापालिका रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

जेव्हा कंत्राटदार स्वत: ५० टक्के कमिशन घेतात, असे लिहित आहेत, तेव्हा यापेक्षा आणखी काय पुरावा हवा? गुन्हा दाखल करुन सत्य लपून राहणार नसल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले आहेत.

दरम्यान, मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता प्रियंका गांधी यांच्या टीकेवरुन भाजपविरुद्ध काँग्रेस समोरासमोर उभे ठाकल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रियंका गांधी आणि कमलनाथ काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube