Download App

आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तकच…; संजय मंडलिकांचा तोल सुटला

  • Written By: Last Updated:

Sanjay Mandlik on Shahu Maharaj : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महारा (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं कोल्हापूरचं राजकीय वातावरण चांगलचं तापणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांकडून वेगळ्या अपेक्षा काय? मंत्री विखेंचा लंकेंवर हल्लाबोल 

महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेतून उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आता प्रचारासाठी जोरदार कंबर कसली. ते सातत्याने शाहू महाराज आणि कॉंग्रेसवर टीका करत आहेत. आताही एका प्रचारसभेत बोलतांना संजय मंडलिक यांचा तोल सुटला. मंडलिक म्हणाले, आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुध्दा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपल्याचं मंडलिक म्हणाले.

राज ठाकरे म्हणजे कर्ण, भूमिका बदलणं जिवंतपणाचं लक्षण; प्रकाश महाजन स्पष्टच बोलले 

मल्लाला हातचं मारायचा नाही. मल्लाला टांग मारायची नाही. मग कुस्ती होणार कशी असा सवालही संजय मंडलिक यांनी केला. ते चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे वक्तव्य केले.

याआधीही मंडलिक यांनी शाहू महाराजांवर बोचरी टीका केली होती. स्वत:चा पराभव टाळण्यासाठी माझ्या विरोधकांनी छत्रपती शाहूंना बळीचा बकरा बनवला आहे. महाराजांना निवडणुकीत उतरवले असले तरी आम्ही गादीचा सन्मान करतो. मात्र निवडणूक निवडणुकीप्रमाणेच लढवली जाईल. कालपर्यंत माझी स्तुती करणारे आज माझ्यावर टीका करत आहेत, असा आरोप संजय मंडलिक यांनी केला होता.

दरम्यान, आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, या मंडलिक यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडी काय प्रत्युत्तर देणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

 

follow us