kolhapur Politics : संजय पवारांकडून उपनेतेपदाचा राजीनामा, पदाधिकाऱ्यांचा गोंधळ

Sanjay Pawar resigns: कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाने (UBT) जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले (Ravikiran Ingwale) यांची नियुक्ती करण्यात केल्यानंतर आता संजय पवारांनी (Sanjay Pawar) उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांनी बैठकीमध्ये राजीनाम्याची घोषणा केल्यावर पदाधिकाऱ्यांनी एकच गोंधळ केलाय. राजीनामा मागे घ्या, मागे घ्या अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू असतानाच पदाधिकाऱ्यांची नाराजी शिगेला पोहोचलीये. ठाकरे गटाने रवीकिरण इंगवले यांना जिल्हाप्रमुखपदी नियुक्त केल्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची नाराजी समोर येऊ लागली आहे. हर्षल सूर्व यांनी शहर समन्वयक पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता शिवसेना उपनेते संजय पवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, २०२२ मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. ही उमेदवारी थेट संभाजी राजे यांच्या विरोधात होती आणि आता तेच संजय पवार जिल्हा प्रमुख निवडीने नाराज आहेत. त्यांनी इंगवले यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे.
रस्ते, मेट्रो अन् सिंचन योजनांसाठी विधीमंडळात 57 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
पवार म्हणाले की, मी १९९० पासून शिवसैनिक म्हणून काम करतोय. गेल्या ३६ वर्षांपासून मी पूर्ण निष्ठेने काम केलंय. मातोश्रीवरून येणाऱ्या आदेशांचे मी तंतोतंत पालन केलं. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून काहीतरी वेगळेच घडत आहे. कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, ही नियुक्ती करताना उपनेत्याला माहिती नसेल तर काय करायचे असं ते म्हणाले.
दरम्यान, संजय पवार यांनी देऊ नये यासाठी अनेकांनी मनधरण केली. संजय पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील सर्किट हाऊस झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत पवारांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ केला. राजीनामा मागे घ्या, अशा विनवण्या या कार्यकर्त्यांनी केल्या. तुम्ही राजीनाम देणार असाल तर आम्हीही राजीनामा देऊ, अशा भावनिक मनधरणीही कार्यकर्त्यांनी केली.