‘संजय राऊत जे बोलले ते बरोबरच, पवारांनी विश्वासघात केला’; विनायक राऊतही संतापले…

  • Written By: Published:
‘संजय राऊत जे बोलले ते बरोबरच, पवारांनी विश्वासघात केला’; विनायक राऊतही संतापले…

Vinayak Raut Attack on Sharad Pawar : मंगळवारी दिल्लीत शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आलाय. यानंतर ठाकरे गट (UBT) चांगलाच आक्रमक झाला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. दरम्यान, आता विनायक राऊत (Vinayak Raut) यांनीही यावर भाष्य केलं.

घृणास्पद..! गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्‍याचार, ठाकरेंच्या खासदाराच्या शाळेत धक्कादायक प्रकार

संजय राऊत जे बोलले, ते अगदी बरोबर आहे, शरद पवारांनी विश्वासघात केला, असा आरोप राऊतांनी केला.

विनायक राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सन्मान केलाय, याविषयी विचारले असता ते म्हणाले, शरद पवार साहेबांनी गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा सन्मान केलाय. शिंदेंचा सन्मान करणे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावणारीच बाब आहे. जे संजय राऊत साहेब बोलले ते अगदी बरोबर हे. राऊत साहेब जे सत्य आहे, ते बोलले आहे. शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवला होता, पण त्यांच्याकडून विश्वासघात झाला, असं राऊत म्हणाले.

ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी गुरुवारी दुपारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. यावरही राऊतांनी भाष्य केलं. उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीक पाहता त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांना सोबत घेतलं. शिंदे गटाकडून राजन साळवींचा वापर करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतोय, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ज्या सामंत कुटुंबाच्या विरोधात साळवी आरोळी फोडत होते, त्यांचं पालकत्व राजन साळवी यांना स्वीकारावं लागणार आहे. हा नियतीने त्यांच्यावर घेतलेला सूड आहे, असंही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात काँग्रेसची कमान कोणाकडे? अध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा 

संजय राऊत काय म्हणाले?
पवारांनी एकनाथ शिंदेंचा सन्मान करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारी गोष्ट आहे. कदाचित पवारांची भावना वेगळी असेल, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. पण ज्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता. यामुळे मराठी माणसांच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहिती नाही. पण, आम्हालाही राजकारण कळतं, पवार साहेब, असा टोला राऊतांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube