Download App

Sanjay Raut : भाजप पक्ष नाही तर मोदी-शहांची टोळी; राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. भाजपा हा ढोंगी पक्ष आहे. तो राजकीय पक्ष नाही तर एक टोळी आहे. राजकीय पक्ष कधी अशी वर्तणूक करतात का. वाजपेयी अडवावणी यांच्या काळात भाजप (BJP) हा विचारधारा जोपासणारा पक्ष होता. आता तसं नाही. आम्ही त्यांना राजकीय पक्ष मानत नाही. ही मोदी-शहांची टोळी आहे. घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती झाली आहे. रावणाची जशी दहा तोंडं उडवली होती. तशी यांचीही तोंडं उडवली जातील, असा इशारा राऊत यांनी दिला.

खासदार राऊत आज सोलापूर दौऱ्यावर होते. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्यातील मराठा आणि ओबीसी वादावर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फैलावर घेतले. ते पुढे म्हणाले, देशात हिंदू-मुस्लिम चालणार नाही ही गोष्ट भाजपाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आता जातीजातीत भांडणं लावण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच शिवसेनेची भूमिका आहे.

Sanjay Raut : तीन घाशीराम सरकार चालवतात, भाजपाकडे नैतिकताच नाही.. राऊतांचा हल्लाबोल

भाजप नेते चिंचोके घेऊन निवडणूक लढतात का ?

झारखंडमधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे तीनशे कोटी रुपयांची रोकड सापडली याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर भाजपाचे नेते काय चिंचोके घेऊन निवडणुका लढतात का, असा सवाल राऊत यांनी केला. विरोधी पक्षाच्या लोकांवर छापेमारी केली जात आहे. पैसे फक्त विरोधी पक्षांकडेच असल्याचे दिसून येत आहे. पण, भाजप काय चिंचोक्यांवर निवडणूक लढवत आहे का. राज्याची सामाजिक एकता उद्धवस्त करायची आणि निवडणुकांना सामोरे जायचे अशीच काही जणांची भूमिका आहे.

फडणवीसांवर आता विश्वास नाही 

राज्यातील मराठा-ओबीसी संघर्षावर राऊत यांनी भाष्य केले. ओबीसींचे काही नेते मराठा समाजाविरोधात बोलत आहेत. मीच हे सगळं घडवून आणतोय हे आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. हा सगळा त्यांचाच डाव आहे. बोलणारी सगळी त्यांच्याच जवळची माणसं आहेत. त्यामुळे आता आमचा फडणवीस यांच्यावरील विश्वास उडाला आहे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

पुण्यात शिवसेनेचे किती आमदार निवडून येतील ? संजय राऊतांची सांगितली गॅरंटी

शिंदेंवर आमचाही विश्वास होता पण.. 

आमचा मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास आहे. शिंदेच निर्णय घेतील, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यांच्या या दाव्यावर बोलताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यावर आमचाही विश्वास होता पण, ते सुरतला पळून जाण्याआधी विश्वास होता, असा टोला राऊत यांनी लगावला.

Tags

follow us