Download App

Satara News : शेतकऱ्यांनो चिंता मिटली! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा…

Satara News : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साताऱ्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाला राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या नियोजनाला सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर दिली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न एकदाचा सुटल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पाण्यापासून वंचित दुष्काळप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार आहे.

पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आमच्या सरकारने मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. सातार्‍यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित होते, त्या परिसराला यामुळे कृष्णा प्रकल्पाचे पाणी उलपब्ध होणार आहे.

साई संस्थान देशभरात उभारणार साईबाबांची मंदिरे; ग्रामस्थांचा मात्र कडाडून विरोध; आंदोलनाचा इशारा

2 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून मुख्यत्त्वे 4 तालुक्यातील 9000 हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार आहे. यात सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांचा समावेश आहे. स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना सुद्धा यामुळे लाभान्वित होणार आहे. सातारा जिल्ह्यातील विशेषत: या तालुक्यांमधील शेतकर्‍यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो!” असं फडणवीसांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

Uday Samant : माझ्या भावाने मशालीचे स्टेटस ठेवले…; भावाच्या ठाकरे गटाच्या प्रवेशावर सामंत म्हणाले…

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पाण्याअभावी दुष्काळप्रवण क्षेत्र होती. या दुष्काळप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पुरेसं पाणी मिळत नसल्याने शेतीही करता येत नव्हती. पावसाच्या भरोशावरच सर्वत्र शेतीची मशागत इथला शेतकरी करत असे. त्यामुळे दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांनी अनेकदा शासनदरबारी कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाची मागणी सातत्याने केली होती.

अखेर आता शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकल्पाचा फेरजल करण्याच निर्णय दिल्याने दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना पाण्याची जी चिंता असायची ती चिंता आता त्यांना नसणार हे मात्र नक्की.

Tags

follow us