Uday Samant : माझ्या भावाने मशालीचे स्टेटस ठेवले…; भावाच्या ठाकरे गटाच्या प्रवेशावर सामंत म्हणाले…

Uday Samant : माझ्या भावाने मशालीचे स्टेटस ठेवले…; भावाच्या ठाकरे गटाच्या प्रवेशावर सामंत म्हणाले…

Uday Samant : मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या भावाने व्हॉट्सअॅप ठेवलेल्या स्टेटसने चर्चांना उधाण आलं आहे. किरण सामंत यांनी ठेवलेल्या स्टेटसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धक्का बसला आहे. यावर आज पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले.

World Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानावरचे रंजक किस्से

माझ्या भावाने मशालीचे स्टेटस ठेवले…

किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठाकरे गटाचे मशाल चिन्ह आणि त्याखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करणारा फोटो ठेवला आहे. त्यामुळे ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर उदय सामंत म्हणाले की, माझ्या भावाने मशालीचे स्टेटस ठेवले ते फक्त तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी. आमच्या कुटुंबात आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो. कुटुंबातील कोणीही निवडणुक लढवणार असेल तो फक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार म्हणूनच। ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

World Cup 2023 : पाकिस्तानी क्रिकेट संघाला बीफऐवजी काय दिलं जातंय? बीसीसीआयनं आहाराची केली ‘ही’ व्यवस्था

त्याचबरोबर यावेळी त्यांनी इतर मुद्द्यांवर देखील प्रतिक्रिया दिली. डाओस ला 40 कोटी नव्हे तर 32 कोटी खर्च झाला. महाराष्ट्राच्या पॅव्हेलीयन साठी 16 कोटी 30 लाख आला. तर तो 2022 च्या तुलनेत 23 चे pavilan मोठे होते. शिवाय  4 दिवस परिषद होती. नागपूरमध्ये ढगफुटी झाली म्हणून मुख्यमंत्री यांनी दौरा रद्द केला. परंतु आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे दौरा रद्द केल्याचं सांगितलं जातं आहे. पण एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी राजकारण करू नये.

Asian Games 2023: स्क्वॉशमध्ये भारताने इतिहास रचला, पाकिस्तानला धूळ चारत सुवर्णपदकावर कोरले नाव

पुढे ते असं म्हणाले की, मी वाघनखं करारासाठी जाणार आहे. डाओसच्या तयारीसाठी मी 3 दिवस जाणार आहे. त्यात मला काही वावगं वाटत नाही. तुम्ही स्वतः माझ्यासोबत या आणि बघा मी कुणाकुणाला भेटतोय सरकारच्या पैशाने कुठे जायचे आणि किती खर्च करायचा? याचं भान आम्हला आहे.इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये. जसे पाण्यात धनाजी संताजी दिसायचे, रोज सकाळी उठून त्यांना फक्त एकनाथ दिसतात.

Panvel Mahanagarpalika मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांची भरती सुरू, महिन्याला ६० हजार पगार

तर वाघनखांच्या मुद्द्यावरून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. वाघनखं हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यासाठी च्या mou साठी आम्ही जाणार आहोत. त्याचा खर्च कोण करणार हे कळेल ना. फडणवीस जपान ला गेले होते. ते महाराष्ट्राच्या हितासाठी गेले. तिथे त्यांना doctorate दिली गेली तो महाराष्ट्राचा बहुमान आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; दोन दहशतवादी ठार

आम्ही पंचवीस वर्षाचा हिशेब काढला तर त्यांचे कुठे कुठे आणि किती खर्च केले हे आम्ही काढलं तर? शिवसेना ही कुणाच्याच बापाची नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक आक्रमक संघटना शिवसेना स्थापन केली होती. मात्र तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला. म्हणून आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी उठाव केला. आमदार आपत्रतेच्या सुनावणी बाबत राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करतात या आरोपात अजिबात तथ्य नाही. उलट त्यांच्याकडूनच उशीर होत आहे.

तर यावेळी जागा वाटपावर बोलताना सामंत म्हणाले, आमचे तिन्ही नेते जागावाटप ठरवतील. ते एकत्र बसून योग्य निर्णय घेतील. आम्हाला लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा मिळतील. खरी राष्ट्रवादी कुणाची अजित पवार शिवसेना ठाकरेंची म्हणाले होते? तुम्हाला काय वाटत? अजित पवार अभ्यास करून, होमवर्क करून आमच्यासोबत आलेले आहेत. आधी ते काय बोलले ती तात्काळ प्रतिक्रिया असेल. मात्र, जे आमच्या सोबत आले त्यांचीच खरी राष्ट्रवादी येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्या जागा आम्हाला मिळाव्यात असा आमचा आग्रह असणार. मावळ मध्ये श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह आहे. ती त्यांना मिळणार. असं यावेळी सामंत म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube