Asian Games 2023: स्क्वॉशमध्ये भारताने इतिहास रचला, पाकिस्तानला धूळ चारत सुवर्णपदकावर कोरले नाव

Asian Games 2023: स्क्वॉशमध्ये भारताने इतिहास रचला, पाकिस्तानला धूळ चारत सुवर्णपदकावर कोरले नाव

Asian Games 2023: भारताच्या स्क्वॉश (Squash) संघाने आशियाई क्रीडा 2023 मध्ये (Asian Games 2023) सांघिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून इतिहास रचला आहे. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारताने प्रथमच स्क्वॉशमध्ये पदक जिंकण्यात यश मिळवले आहे. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे 10 वे सुवर्णपदक आहे.

अंतिम फेरीच्या तिसऱ्या सामन्यात भारताच्या अभय सिंगने पाकिस्तानच्या जमान नूरवर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. याआधी दुसऱ्या सामन्यात सौरव घोषालने मुहम्मद असीम खानचा पराभव करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; दोन दहशतवादी ठार

भारतीय स्क्वॉश संघाच्या अंतिम सामन्यातील पहिल्या सामन्याची सुरुवात पराभवाने झाली. महेश मंगनवार नासिर इक्बालविरुद्ध सेटमध्ये पराभूत झाला. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताचा स्टार स्क्वॉशपटू सौरव घोषालने शानदार खेळ करत संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या सामन्यात अभय सिंगच्या विजयासह स्क्वॉश संघाला सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. याआधी ग्रुप स्टेजमध्ये भारताला स्क्वॉश मॅचमध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

World Cup 2023 : पाकिस्तानी क्रिकेट संघाला बीफऐवजी काय दिलं जातंय? बीसीसीआयनं आहाराची केली ‘ही’ व्यवस्था

19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आता 36 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये 10 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. सातव्या दिवसाची सुरुवात भारतासाठी खूप चांगली झाली त्यात रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले या जोडीने अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवत मिश्र दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube