Download App

Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्या कधीच मोकळ्या दिसत नाहीत; शंभुराज देसाईंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Shambhuraj Desai On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात खुर्च्या मोकळ्या दिसल्याच्या आरोपावर मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai)यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या सभेची उद्धव ठाकरे यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. त्यामुळे ठाकरेंनी शिंदे गटाच्या सभेचं सगळं रेकॉर्डिंग पाहावं आणि नंतर असं वक्तव्य करा, असं थेट आव्हानच उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

Madhya Pradesh : नोकरी गेली अन् तिकीटही नाही! चौहान सरकारने केला उपजिल्हाधिकाऱ्याचा गेम

सातारा जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याचा आढावा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पाणीसाठ्याची माहिती दिली. त्याचबरोबर विविध मुद्द्यांवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच केला ‘हा’ कारनामा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये मंत्र्यांच्या खुर्च्या भरलेल्या असतात पण सभेतल्या खुर्च्या मात्र मोकळ्या असतात, असा आरोप केला. त्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरेंना प्रतिप्रश्न केला की, उद्धव ठाकरेंना कधी खुर्च्या रिकाम्या दिसल्या? उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेचे जुने रेकॉर्डिंग मागवून त्यांनी ते पाहावे आणि मग त्यावर बोलावे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेत खुर्च्या कधीच रिकाम्या राहात नाहीत, खुर्च्या कमी पडतात असेही यावेळी मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यंदा संभाव्य पाणी टंचाई भासणार असल्याने सध्या डिसेंबर 2023 अखेरपर्यंतच्या पाण्याचं नियोजन करावं. पाण्याची उपलब्धता पाहून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी प्राधान्यानं सोडावं.

कोयना धरणातील 67 टक्के पाणीसाठा हा विद्युत निर्मितीसाठी राखीव असतो. याबद्दल डिसेंबरनंतर आढावा घेऊन पिण्यासाठी व सिंचनासाठी राखीव ठेवण्याबद्दल शासनाला प्रस्ताव पाठवावा. सध्याच्या परिस्थितीत रब्बीची आर्वतनं ठरल्याप्रमाणं सोडावी अशा सूचना देखील पालकमंत्री देसाई यांनी केल्या.

Tags

follow us