Satej Patil यांचा वाढदिवस की राजाराम साखर कारखान्याच्या निवडणूकीचा प्रचार

Satej Patil Birthday : आज कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांगच रांग लागली होती. यावेळी सतेज पाटील वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना मात्र श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा प्रचारच सुरू असल्याचं दिसून आलं. कारण कॉंग्रेस आणि सतेज पाटलांनी श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी […]

Satej Patil

Satej Patil

Satej Patil Birthday : आज कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांगच रांग लागली होती. यावेळी सतेज पाटील वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना मात्र श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा प्रचारच सुरू असल्याचं दिसून आलं.

कारण कॉंग्रेस आणि सतेज पाटलांनी श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी कंबर कसायला सुरूवात केली आहे. यावेळी त्यांना माजी आमदार महादेवराव महाडिकांची गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ सत्ता असलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्यात सत्तांतर घडवून आणायचं आहे.

Mumbai High Court : ‘धनगड’ की ‘धनगर’ मुद्देसूद पुरावे सादर करा…

त्यामुळे माजी पालकमंत्री आणि कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी राजाराम कारखान्याचा निकाल आमच्या बाजूने लागणार असा आत्मविश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर ते यावेळी म्हणाले की, राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांना समृद्धी मिळावी. सामान्य माणसाला आधार मिळून रोजगार मिळावा. ही अंबाबाई चरणी प्रार्थना.

Exit mobile version