Download App

महाडिकांनी रडीचा डाव खेळायला नको होता; सतेज पाटलांचा हल्लाबोल

Satej Patil’s criticism on Mahadik : राजाराम सहकारी साखर कारखाना (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध ठरलेल्या 29 उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक आपली दाखल केले होते. मात्र त्यांनीही दाखल केलेले अपील नामंजूर केले आहे. यानिर्णयावरून राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी महाडिकांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. कारखान्याच्या निवडणुकीत आमचे उमेदवार अपात्र करण्याचा रडीचा डाव खेळला आहे. सहकारातील हा निर्णय दुर्दैवी असून तो संपूर्ण राज्याला लागू होणार आहे, असे देखील सतेज पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

अजिंक्यतारा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सतेज पाटील हे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी झालेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत थेट महाडिकांवर हल्लाबोल केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, राजाराम कारखान्याच्या निवडणूक यंत्रणेवर भाजपचा दबाव आहे. परिवर्तन आघाडीच्या २९ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज हे कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपात्र ठरवले.

हाच निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडून देखील कायम ठेवण्यात आला. वेळेत निर्णय द्यावा म्हणून केवळ तारखेची औपचारिकता ठेवली आणि मध्यरात्री निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, प्रादेशिक साखर आयुक्तांकडून मध्यरात्रीच्या सुमारास काढण्यात आलेल्या आदेशावर आज पत्रकार परिषदेत सतेज पाटलांनी जोरदार निशाणा साधला आहे. मध्यरात्री आपात्रतेची नोटीस काढली जाते, यावरून महाडिक भ्याले अशी टीका महाडिकांवर केली आहे.

कुशल बद्रिके साकारणार क्रूरकर्मा कुरबतखान, रावरंभा चित्रपटात पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, भाजपच्या दबावापुढे आयुक्तांनी मध्यरात्री हा निकाल दिला आहे. पण आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहे. आमचे अजून 50 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी आम्ही हायकोर्टात जाणार आहोत.

भगवे कपडे घातले म्हणजे साधू झाले का? नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाडिक हे भयभीत झाले असल्याने त्यांनी षडयंत्र रचून आमचे 29 उमेदवार अपात्र ठरवण्यासाठी प्रयत्न केले. आमच्याकडे सर्व गटात उमेदवार आहेत, त्यामुळे लढाई होणार. 28 वर्षात ज्यांनी सभासदांना जुमानले नाही, ते महाडिक आता सभासदांच्या दारोदारी फिरत आहेत. सभासदांच्यात उठाव आहे त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीत बदल होणार हे तुम्ही पहाच असेही ते म्हणाले.

Tags

follow us