Download App

मी बाजूला होईल, पण दीपक साळुंखेंना आमदार करेन; शहाजीबापू पाटलांचे मोठं विधान

  • Written By: Last Updated:

Shahajibapu Patil : काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी मी सांगोल्यातून विधानसभा (Sangola Assembly) लढवणारच, पुढं कोणी असू द्या, मागं हटणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांचं टेन्शन वाढलं होतं. मात्र, आज शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी मोठं विधान केलं. त्यांच्या या विधानामुळं अऩेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

IND vs AFG: टी-20 मालिकेसाठी रोहित, कोहलीचे संघात ‘कमबॅक’; गोलंदाजीमध्ये मोठे बदल

दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांसमोर शहाजीबापू पाटील यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले, मी सध्या आमदार आहेच. पण, माझ्याबरोबर दीपक (आबा) साळुंखे हेही आमदार असतील. येणाऱ्या पाच वर्षात आबा आमदार झाले नाहीतर मी बाजूला होईन. पण, आबाला आमदार करेन, अशी घोषणा केली.

बच्चे मन के सच्चेच असतात, पण काही खोड्या काढणारे; रुपाली चाकणकरांचा रोहित पवारांना टोला 

डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे मी सध्या बाहेर जात नाही. पण, दीपक साळुंखे यांच्या कार्यक्रमाला आलो नसतो तर साळुंखे कुटुंबाला काही वाटलं नसतं. पण, पत्रकारांनीच कालवा केला असता. म्हणून मी इथं आलो. आमची मैत्री ही आजकालची नाही. शिवाजी विद्यापीठाच्या राजकारणात आम्ही अकरा वर्ष एकत्र घालवली. आमचा पक्ष वेगळा असला तरी व्यक्तिगत जिव्हाळा कायम आहे, असंही शहाजी पाटील म्हणाले.

ते म्हणाले की, सत्तशिवाय कामं होत नाहीत. विकास होत नाही. दुष्काळी तालुक्याला हिरवंगार करण्याठी सत्ता हवीच असते. आमच्या सत्तेच्या काळात सध्या झालेलं परिवर्तन आपण याही डोळा पाहत आहात. त्यामुळं येणाऱ्या काळातही तालुक्याचा सत्तेतून विकास करायचा, हे आम्ही दोघांनीही ठरवलं आहे, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, सांगोला मतदारसंघ हा माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत गणपत देशमुखांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी आमदार शहाजी पाटील यांना घाम फोडला. शहाजी पाटील अवघ्या 700 मतांनी विजयी झाले होते. शहाजी पाटील यांना दीपक साळुंखे यांनी मदत केली होती.

तर दीपक साळुंखे यांनीही विधानसभा लढविण्याची घोषणा केली होती. त्यामुळं दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, आज शहाजी पाटलांना दीपक साळुंखे यांना आमदार करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळं साळुंखे यांची घोषणा प्रत्यक्षात येते का, हे पाहावं लागेल.-

follow us