डॉक्टरांकडून आरामाचा सल्ला पण, गद्दारांना गाडण्यासाठी मैदानात; अँजिओप्लास्टिनंतर ठाकरे कडाडले

  • Written By: Published:
डॉक्टरांकडून आरामाचा सल्ला पण, गद्दारांना गाडण्यासाठी मैदानात; अँजिओप्लास्टिनंतर ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray : राजन तेली (Rajan Teli) आणि दीपक साळुंखेंनी (Deepak Salunkhe) आज ठाकरे पक्षात (UBT) प्रवेश केला. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) तोंडावर असल्याने ठाकरे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेत. त्यांच्या उपस्थितीत राजन तेली आणि दीपक साळुंखेंनी हातावर शिवबंधन बांधले. यावेळी बोलताना ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.

मोठी बातमी : शरद पवारांशी जवळीक भोवली; अजितदादांकडून आमदार सतीश चव्हाणांची हकालपट्टी 

आधी हरामांना घालवायचं….
या पक्षप्रवेशावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, आज मी दसऱ्यानंतर पहिल्यांदाच तुमच्यामध्ये आलेलो आहे. मधल्या काळात हॉस्पिटलची एक वारी करावी लागली. डॉक्टर म्हणाले आराम करा. पण आता आराम करायचा तरी किती? आधी हरामांना घालवायचं. त्यामुळ आता आराम नाही. आजपासून कामाला सुरुवात केली. मुहूर्त चांगला लाभला आहे. आबासाहेब मजबूत गडी असून ते शिवसेना परिवारात सामील झाले आहेत. आबा, तुमच्या हातात मशाला दिलीये. त्याचा अर्थ ज्यान त्याने समजून घ्यावा. आता ही मशाल कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येक घराघरात मशाल घेऊन जा…
आजपासून पूर्ण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घराघरात मशाल घेऊन जा. कारण हे जे गद्दार आहेत, ते नुसते गद्दार नाहीत ते धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम निर्माण करत आहेत. म्हणूनच शिवसेनाप्रमुखांची निशाणी मशाल आहे, ती आतापासून आपल्याला घरोघरी पोहोचवायची आहे, असंही ठाकरे म्हणाले.

तो जरी गद्दार झाला तरी सांगोलेकर माझ्यासोबत
तुम्ही दीपक आबांना उमेदवारी जाहीर करा म्हणता, पण आपण अजून कोणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही. मी फक्त एवढचं सांगेन की, दीपक आबांच्या हाती मशाल दिलेली आहे. मशालीची धग तुम्हाला दाखवून द्यायची आहे. मी सभेला आल्यावर सविस्तर बोलेनच. तूर्तीस मी मी पार्टीमध्ये तुमचे स्वागत करतो. सांगोल्याचा जो आमदार निवडून आला होता, तो जरी गद्दार झाला तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहेत, हे तुम्ही दाखवून दिलं, असं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीशी एकनिष्ठ असलेल्या शेकापने सांगोला मतदारसंघावर दावा केला. सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला आहे. येथून बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख हे दोन्ही बंधू शेकापकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. अशातच दीपक साळुंखे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळं आता शेकाप काय निर्णय घेतं? हेच पाहणं महत्वाचं आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube