छत्रपती संभाजी महाराज कडवे धर्मवीर.., आमदार शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य
अहमदनगर : छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच, त्यासोबतच कडवे धर्मवीरही होते, अशी प्रतिक्रिया सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. आमदार पाटील आज अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडावर आयोजित कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
‘त्यांची विजयाची लायकी नाही’; खडसेंचा BJPवर हल्लाबोल
आमदार पाटील पुढे बोलताना म्हणाले, आज मी पहिल्यांदाज धर्मवीर गडावर आलो आहे. धर्मवीर गडाची अवस्था पाहून निश्चित अंतकरणात वेदना झाल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान याच ठिकाणी बलिदान झालं आहे. हे स्थळ आमच्यासाठी पवित्र असल्याचं आमदार पाटील म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराजांचं हे पवित्र स्थळ जतन करण्यासाठी जनतेनं आणि शासनानं लक्ष केंद्रित करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं आमदार शहाजीबापू पाटलांनी ठामपणे सांगितलं आहे.
गडाच्या सुशोभिकरणासाठी प्रथमत: गडावर येणाऱ्या रस्त्यांचे चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करण्याला प्राधान्य देणार असून इतिहासकारांकडून अधिक माहिती घेत छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गड इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी आयोजित कार्यक्रमाला आमदार पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी गडाची पाहणी करुन सुशोभिकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही दिले आहे.