‘त्यांची विजयाची लायकी नाही’; खडसेंचा BJPवर हल्लाबोल

‘त्यांची विजयाची लायकी नाही’; खडसेंचा BJPवर हल्लाबोल

जळगाव : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानतर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यांची उत्सुकता लागली होती. निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याआधी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांचं नावाची शिफारस केली होती. जळगाव जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत मोठी ट्विस्ट पाहायला मिळाला. राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीचेच संचालक संजय पवार (Sanjay Pawar) यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती. विशेष म्हणजे, रवींद्र पाटील यांचा पराभव करून संजय पवारांनी अध्यक्षपदी विजय मिळवला. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी बंडखोर संजय पवार आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला.

पराभवानंतर माध्यमांशी संवाद साधतांना एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपने राष्ट्रवादीचा गद्दार नेता संजय पवार याला हाताशी घेतलं. त्यामुळे त्यांना हे यश मिळालं. नाहीतर त्यांची विजयाची लायकी नाही, अशी शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

यावेळी खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, जळगावात भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस मी दाखवले. भाजपला बळकडी मी दिली. त्यामुळेच गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना भाजपमध्ये स्थान मिळालं. दरम्यान, आमच्यातला एकजण हा गद्दार झाला म्हणून यांच्या ताब्यात जिल्हा बँक आली. अन्यथा आमचा पराभव करणं कुणालाही शक्य नव्हतं. आजकाल आपल्या अहंकारापोटी गिरीश महाजन हे काहीबाही बोलत आहेत. मात्र एकटा नाथाभाऊ यांना जड जात आहे, असं खडसे म्हणाले.

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा नवा विक्रम

दरम्यान, निवडणुकीत गद्दारी करून जिंकणं यात काही पुरुषार्थ नसतो. त्यापेक्षा लोकशाही पद्धतीने समोरासमोर निवडणूक लढून जिंकून दाखवा, असा इशारादी खडसेंनी भाजपला दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube