Download App

गळ्यात कांद्याच्या माळा अन् हातात निवेदन, शेतकऱ्याने पवारांचा ताफा अडवत मांडल्या व्यथा

अहमदनगर : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने एका हवालदिल शेतकऱ्याने गळ्यात कांद्याच्या माळा घालत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीचा ताफा अडवत आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

आज शरद पवार अहमदनगरला आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास आले होते. शरद पवार यांच्या गाडीचा ताफा भर रस्त्यात अडवून एका तरुण शेतकऱ्याने कांद्याला हमीभाव देण्याची मागणी केलीय.

घरगडी घरात बसून गाजराचा हलवाच बनवत असतो, उद्धव ठाकरेवर भाजपाकडून बोचरी टीका

याबाबतचे निवेदनच तरुण शेतकऱ्यांने शरद पवारांना दिले आहे. सुरुवातील शरद पवार ज्या रस्त्यावरुन जात होते, त्या रस्त्यावर उभे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी संतप्त शेतकऱ्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त शेतकऱ्याने मला फक्त साहेबांना निवेदन द्यायचे आहे, या शब्दांत विनवणी केल्यानंतर त्याने शरद पवार यांच्या गाडीचा ताफा थांबवून कांद्याला भाव देण्याच्या मागणीचे निवेदन दिलं आहे.

राज्यात कांदा उत्पादक आधीच अर्थिक संकटात सापडलेला असताना त्यात आता अवकाळी पावसाची भर पडली आहे. होतं नव्हतं तेवढ्याही पिकांचं नूकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अजितदादांना धक्का दिल्यानंतर फडणवीस हे रोहित पवारांच्या विरोधात बार उडविणार…

कालच राज्य सरकारचं अर्थसंकल्प सादर करण्यात आलं असून त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ठोस मदत मिळेल अशी एकही घोषणा न झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

अखेर हवालदिल शेतकऱ्यासमोर काही मार्ग न उरल्याने पवार साहेब तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी केली आहे. कार्यक्रमासाठी आलेल्या शरद पवारांना हेलिपॅडवरच गळ्यात कांद्याच्या माळा घालून शरद पवारांना निवेदन दिले आहे.

दरम्यान, गाडीत असतानाच शरद पवारांनी या संतप्त शेतकऱ्याचं निवेदन घेतलं असून निवेदन दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यावर हसू पिकलं होतं. आता शरद पवारांना निवेदन दिल्यानंतर तरी सरकारकडून काहीतरी ठोस पाऊले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली असावी असा अंदाज बांधला तर काही वावगं ठरणार नाही.

Tags

follow us