कोल्हापूर : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (MP Darhysheel Mane) यांचा ताफा अडवून साहेब गद्दारी का केली? अशी विचारणा ठाकरे गटाच्या (ShivSainik) कार्यकर्त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या होत्या. या झालेल्या प्रकारावर खासदार धैर्यशील माने यांनी पडदा टाकायचा प्रयत्न केला. ही वेळ राजकारणाची नसून त्या मुलांवर कारवाई करु नका असे अवाहन पोलीसांना (Kolhapur Police) त्यांनी केले आहे.
धैर्यशील माने म्हणाले, एका विकास कामाच्या उदघाटन कार्यक्रमानिमित्त मतदारसंघात होतो. माझ्यासोबत पोटतिडकीने काम केलेल्या काही मंडळींनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्याशी बोलण्यासाठी मी गाडीतून खाली उतरलो. त्या परिस्थित काही गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी त्यांना बाजूला करत असताना अॅक्शन रिअॅक्शन झाली. चित्रीकरण झाले तशाप्रकारचा काही प्रसंग नव्हता. त्यांना माझ्याशी बोलायचे होते. यावर आमच्या जुन्या सहकाऱ्यांनी प्रतिक्रिया देणं, वाद प्रतिवाद वाढणं यामध्ये मला पडायचे नाही, अशी प्रतिक्रिया देत खासदार धैर्यशील माने यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
WIPL 2023: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा धुमाकूळ, केली विजयाची हॅट्रिक
ते पुढं म्हणाले, मला मतदार संघातील विकास कामांवर लक्ष द्यायचे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा विकासाचा अजेंडा आहे. हा अजेंडा प्रत्येक घर आणि गावापर्यंत घेऊन जायचा आहे. याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मतदार संघाचा विकास यासाठी माझे काम चालू आहे. यासाठी मी दोन्ही बाजूच्या लोकांना विनंती करतो आहे. आमच्या लोकांना सांगितले आहे की कोणतीही रिअॅक्शन द्यायची नाही. त्या मुलांवर कोणतीही कारवाई करायची नाही हे पोलीसांना सांगितले आहे. जी काही गोष्ट घडली असेल त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या कामाकडे लागलं पाहिजे, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.