WIPL 2023: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा धुमाकूळ, केली विजयाची हॅट्रिक
मुंबई : आतापर्यंत मुंबई इंडियन्स महिला प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसली आहे. लीगच्या पहिल्याच सामन्यातून संघाने आपली क्षमता सिद्ध केली. गुजरात जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 143 धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. फलंदाजीसोबतच संघाची गोलंदाजी देखील उत्कृष्ट आहे.आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांत मुंबईने विरोधी संघाला त्यांच्यासमोर टिकू दिलेले नाही. दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी विरोधी संघाला 105 धावांत ऑलआउट केले.
Jadeja Bowled Smith: स्टीव्ह स्मिथला चकमा देत जडेजाने केले बोल्ड, पाहा व्हिडिओ
विरोधी संघ तिन्ही सामन्यात ऑलआऊट
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी आतापर्यंत महिला प्रीमियर लीगमधील तिन्ही सामन्यांमध्ये विरोधी संघाला ऑलआऊट केले आहे. पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सला अवघ्या 64 धावांत गुंडाळले. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १५५ धावांत सर्वबाद केले. आणि आता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, मुंबईच्या गोलंदाजांनी विरोधी संघाला 105 धावांत गुंडाळले आणि सामना 8 गडी राखून जिंकला.
IND vs AUS 4th Test आजचा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, उस्मान ख्वाजाने झळकावले शतक
मुंबईच्या गोलंदाजाने आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत
मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू सायका इशाक या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. तिने केवळ 3 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या पर्पल कॅप सायकाकडे आहे. सायका आपल्या फिरकी गोलंदाजीसमोर कोणत्याही मोठ्या महिला फलंदाजांना चकवा देत आहे. पहिल्याच मॅचमध्ये तिने 4 विकेट्स घेतल्या. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने 2 बळी घेतले आणि आता तिसऱ्या सामन्यात 3 बळी घेतले.