IND vs AUS 4th Test आजचा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, उस्मान ख्वाजाने झळकावले शतक

  • Written By: Published:
IND vs AUS 4th Test आजचा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, उस्मान ख्वाजाने झळकावले शतक

IND vs AUS 4th Test Day 1 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसअखेर पाहुण्या संघाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर उस्मान ख्वाजाने भारताविरुद्धच्या कसोटीतील पहिले शतक झळकावले. ख्वाजा 15 चौकारांच्या मदतीने 104 धावा करून नाबाद परतला. त्याच्यासोबत कॅमेरून ग्रीन 49 धावा करून नाबाद राहिला. या अगोदर ट्रॅव्हिस हेड (32), मार्नस लॅबुशेन (3), पीटर हँड्सकॉम्ब (17) आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ (38) धावांचे योगदान दिले.

Maharashtra Budget 2023 : अहमदनगर जिल्ह्याला काय? मिळाले पाहा…

ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी केली

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फॉममध्ये दिसले. ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लबुशेन अवघ्या 3 धावा करून मोहम्मद शमीचा बळी ठरला. यानंतर ख्वाजाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. या दोघांनी मिळून पहिल्या सत्रात संघाला 2 बाद 100 पार नेले. या सामन्यात रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथला आपला शिकार बनवले. संघाची धावसंख्या 170 असताना स्मिथ 38 धावा करून माघारी परतला.

Maharashtra Budget : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस, किसान सभेची टीका

भारतीय गोलंदाज अपयशी ठरले

या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. मोहम्मद शमीने 17 षटकात 65 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय उमेश यादवने 15 षटकात 58 धावा दिल्या आणि त्याला यश मिळाले नाही. त्याचवेळी रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी अनुक्रमे 49 आणि 57 धावा देऊन 1-1 बळी घेतला. अक्षर पटेलही विकेट घेण्यात अपयशी ठरला. त्याने 12 षटकात 14 धावा दिल्या. त्याचवेळी श्रेयस अय्यरनेही एक ओव्हर टाकली, ज्यामध्ये त्याने 2 धावा खर्च केल्या.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube